एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा म्हणजे झी युवावरची प्रेम पॉयजन पंगाही मालिका. जुई ही एक मनमिळाऊ सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं, मनुष्य रुपात वावरणाऱी जुई जेव्हा तिच्या या आयुष्याचा तिढा सोडवू पहात असते तेव्हा ती आलाप या अत्यंस साध्या सरळ आणि समंजस तरुणाला भेटते आणि तिचं अवघं आयुष्यच बदलून जातं. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते सुखाचा संसार असा या जुई आलापचा प्रवास प्रेम पॉयजन पंगा या मालिकेमध्ये पहायला मिळाला आणि आता ही मालिका एका महत्वाच्या आणि अंतिम वळणार येऊन ठेपलीये.
जुईच्या आयुष्याचं एक कडवं सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं एका बेसावध क्षणी जुईचं हे खरं रुप आलाप च्या समोर येतं आणि तो हादरुन जातो पण त्यानंतरही आलाप तिला स्विकारतो पण त्याची बायको म्हणून नाही तर त्याच्या कुटुंबाची सून म्हणून. आता मालिका अंतिम टप्प्यावर येत असताना जुईच्या आयुष्यातलं हे रहस्य आता तिच्या सासरच्यांसमोर उलगडणारे आणि त्यापुढे काय होणार, तिची सासरची माणसं जुईला त्याची लाडाची सून म्हणून स्विकारणार का हे मात्र आपल्याला मालिकांची आगामी भाग पाहिल्यानंतरच कळणारे.
येत्या २५ सप्टेंबरला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल त्यानंतर झी युवावर कोणती नवी मालिका सुरु होणारे हे मात्र अजूनहीतरी गुलदस्त्यात असून त्याबद्दलचं सरप्राईज प्रेक्षकांना लवकरच मिळेल. तोपर्यंत आपल्या या लाडक्या मालिकेचे कुठचेही भाग चूकवू नका पहात रहा प्रेम पॉयजन पंगा दररोज रात्री साडे आठ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.
No comments:
Post a Comment