Friday 23 October 2020

रेसिपींसह गप्पा – गोष्टींचा मसालेदार तडका - आज काय स्पेशल कलर्स मराठीवर !

मुंबई २३ ऑक्टोबर, २०२० : महाराष्ट्राची ओळख आहे इथले सण आणि त्या सणांची ओळख आहे त्या त्या दिवशी बनवले जाणारे रुचकर पदार्थ... जसं गणेशोत्सव असेल तर मोदक, दिवाळी असेल तर चिवडा, चकली, नारळी पौर्णिमा असेल तर नारळी भात, होळी म्हंटल की पुराणपोळी... अगदी तसंच दसर्‍याच्या निमित्ताने आम्ही तुम्हां रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत एक चविष्ट, खुमासदार शो... जिथे रंगणार खमंग गप्पा आणि तुम्हाला बघायला मिळणार रेसेपिजाचा खुमासदार खेळ खवय्येगिरीचा हा शो जो आहे अस्सल ज्याचं नावं आहे आज काय स्पेशल... दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून शनि – रवि दुपारी १.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली खरे करणार आहे... तर पराग कान्हेरे यांच्या काही खास रेसेपीज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... पहिल्या भागामध्ये जीव झाला येडापिसा या लोकप्रिय मालिकेमधील आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित आणि सरकारची भूमिका साकारणारा रोहित हळदीकर येणार आहेत... तेंव्हा नक्की बघा आज काय स्पेशल कलर्स मराठीवर ....

कार्यक्रमाची सूत्रसंचालक सोनाली खरे म्हणाली, मला आनंद आहे की मी पुन्हाएकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय... स्वयंपाक कारणे हे कोणत्याही गृहिणीला आवडते... मी लॉकडाउनमध्ये बर्‍याच नवनवीन रेसेपीज शिकले... जणू या शोची रंगीत तालिम झाली होती... आणि या कार्यक्रमामुळे मला माझ्या जुन्या सहकलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे याचा एक वेगळाच आनंद आहे”.

एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे म्हणतात. हा कार्यक्रम बघून तुम्ही देखील तुमच्या जवळच्या माणसांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांची मने जिंकू शकता. या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना रुचकर आणि चविष्ट पदार्थ एका नव्या रुपातनव्या पद्धतीने शिकण्याची वा प्रेक्षकांना दाखविण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाद्वारे तुमच्यातील पाककलेला दिशा मिळणार आहे... या कार्यक्रमामध्ये दाखविल्या जाणार्‍या खुमासदार रेसेपीजने तुमचे किचन सजणार यात शंकाच नाही... कार्यक्रम रुचकर तर असेलच यात काही शंका नाही पण तो खमंग पद्धतीने डिजाईन करण्यात आला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तेंव्हा नक्की बघा आज काय स्पेशल २५ ऑक्टोबरपासून शनि – रवि दुपारी १.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर...

No comments:

Post a Comment