Saturday, 17 October 2020

नितीन प्रकाश वैद्य यांच्याआगामी सिनेमासाठी प्रार्थना, रिंकू, सुव्रत लंडनला झाले ‘छूमंतर’ - Prarthana Behere & Rinku Rajguru Reach London For Nitin Prakash Vaidya’s New Film ‘Choomantar’

लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेकांच्या कामाला ब्रेक लागला होता. असं वाटत होतं जणू काय आयुष्यंच थांबलंय...गेल्या सहा-सात महिन्यांत प्रत्येकांनी स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवूण ठेवलं होतं. पण लॉकडाऊन शिथील झाल्यावर जो-तो त्याच्या कामाचे रुटिन सुरु करुन नव्या उमेदीने कामाला सुरुवात करतोय. अशाप्रकारे मनोरंजनसृष्टीने देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या उत्साहाने शूटिंगला सुरुवात केली आहे.

अलीकडे मराठी सिनेमांचं बहुतांशी शूटिंग हे परदेशात होतंपण आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाच्या काळात देखील मराठी सिनेसृष्टीने त्यांच्या आगामी प्रोजेक्टचं शूट परदेशात करण्याचं ठरवलं आहे. गच्ची’, ‘नाळ’, ‘मन फकीरा’ यांसारखे अनेक सिनेमांची निर्मिती करणारे निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांचा छूमंतर’ या आगामी द्विभाषिक सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये सुरु झाले आहे. समीर जोशी दिग्दर्शित छूमंतर’ सिनेमात प्रार्थना बेहरेरिंकू राजगुरुसुव्रत जोशी आणि रिशी सक्सेना हे कलाकार असणार आहेत.

मराठी निर्मात्यांमध्ये नितीन प्रकाश वैद्य यांचं नाव नेहमी अव्वल स्थानावर येतं कारण त्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांची मनोरंजनाची रुची जाणून घेऊन सिनेमांची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या काळात सिनेमाच्या दृष्टिनेशूटिंगसाठी परदेशी प्रवास करणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. याविषयी मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, “सध्याच्या कोव्हिडच्या परिस्थितीत सिनेमा करणं हे तसं आव्हानात्मकच आहे. पण नंतर लक्षात आलं की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या तुलनेते परदेशात कोव्हिडच्या केसेस कमी आहेत आणि रिस्क पण कमी आहे म्हणून लंडनची निवड केली. यापूर्वी लंडनमध्ये मी खूप वर्ष शूटिंग केले आहे. या सिनेमासाठी फक्त २० ते २५ जणांचं युनिट आहे. लंडनच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी सावधगिरी आणि काळजी म्हणून मी आमच्या डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार महिनाभराचा इम्युनिटी बूस्ट अपचा कोर्स टीमसाठी चालू केला आहे. भारतातून निघायच्या आधी प्रत्येकाच्या तीन कोव्हीड टेस्ट करुन घेतल्या. त्यांचा नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच मी तिकीट्सव्हिझाचं काम केलं. प्रत्येकाला कोव्हिडचा इन्शुरन्स केला. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर आपण करतोय याची काळजी आणि जबाबदारी प्रत्येकाने घेतलेली आहे. उत्सुकता तर आहेच पण त्याही पेक्षा भिती आणि काळजी पण आहे. कारण ही खूप मोठी रिस्क आहे. पण सुरक्षिततेच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असणा-या नियमांचे पालन करुन शूटिंग सुरळितपणे नक्की पूर्ण करु.

प्रार्थना बेहरेने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर तिच्या लंडनच्या सिनेमाची कल्पना तिच्या फोटोस् मधून चाहत्यांना दिली होती. या सिनेमाच्या शूटिंगसाठीच प्रार्थना लंडनला रवाना झाली होती. या विषयी प्रार्थना म्हणाली, “भारतातून लंडनला यायच्या आधी संपूर्ण क्रू ची कोव्हिड टेस्ट झाली होती आणि अर्थात रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यामुळे आम्हांला लंडनला जाण्याची परवानगी मिळाली. कोव्हिडच्या परिस्थितीमुळे एअरपोर्टवर नेहमी सारखं वातावरण नव्हतंसगळीकडे शांतता होती. कोरोनामुळे सर्वत्र किती बदल झाला आहेत्याचा लोकांवर किती परिणाम झाला आहे याची जाणीव एअरपोर्टवरच झाली होती. विमानात देखील सर्व नियम पाळले जात होतेतीन जणांच्या सीटवर मी फक्त एकटीच होते. आम्ही टीम जिथे कुठे जाणार तिथे एकत्रच असणारशूट लोकेशन ते हॉटेल इतकाच प्रवास करायचामास्क-सॅनिटायझरचा वापर करुन प्रत्येकजण काळजी घेतोय.लंडनमध्ये एक चांगली गोष्ट आहे की इथे माणसं कमी आणि जागा जास्त आहेत्यामुळे सोशल डिस्ट्नसिंग आहेच.

हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत बनणा-या या सिनेमात रिंकू राजगुरु पण दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू पहिल्यांदा परदेशात शूटिंग करणार आहे. मुंबई ते लंडन हा माझा प्रवास एक्सायटमेंटने भरलेला होता. दोन्ही विमानतळावर योग्य ती काळजी घेतली जात होती हे पाहून खूप समाधान वाटले. मी देखील सर्व नियमांचे पालन करुनच प्रवास केला आणि शूटिंगच्या सेटवर वावरताना देखील स्वत:ची काळजी घेईन,” असे रिंकूने सांगितले.

या सिनेमाच्या शूटिंगविषयी बोलताना सुव्रत जोशीने म्हटले की, “सध्याच्या परिस्थितीत शूटिंगचा अनुभव काही वेगळाच होता. शूटिंगमधील सीन्स करतानासेटवर वावरताना आम्ही सगळे खूप सावधगिरी बाळगतो. संपूर्ण टीम एक ग्रुप म्हणून एकत्र असतो आणि हॉटेल ते सिनेमाचा सेट आणि सेटवरुन पुन्हा हॉटेलवर एवढीच ये-जा करण्याची परवानगी आहे त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आणि प्रत्येकजण योग्य ती काळजी घेत आहे.

नितीन प्रकाश वैद्य यांचा आणखी एक सिनेमासोबतीला तगडी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये छूमंतरची उत्सुकता वाढणार यात मुळीच शंका नाही.

Everything came at a halt since lockdown started and in this period people got busy with some other work. As the restrictions on lockdown got eased, people again got back to their work with more energy & motivation.  Even our film industry began their work again to entertain the audience.

In the past few years, many Marathi films were shot in foreign countries, but in this difficult period of Covid, Marathi film did not step back and began its work. Nitin Prakash Vaidya who has produced films like 'Gachchi', 'Naal' and 'Mann Fakiraa' is back with his new Marathi film 'Choomantar' which will be a bilingual film starring Prarthana Behere, Rinku Rajguru, Suvrat Joshi, and Rishi Saxena. Sameer Joshi will be directing this multi-star film.

When we talk about Marathi films Producer Nitin Prakash Vaidya's name is always top of the list for his amazing content. While talking about this film he said, "Shooting in this period is challenging. But if see the number of Covid cases in foreign countries it is much less compared to our Maharashtra and India, so the risk is very less which is why I choose London. I have also done a lot of shooting here in the past. Our film unit is only of 20-25 people. Before heading towards London, for everyone's safety, we also started the immunity boost up course as per my doctor's guidance. Before leaving India each one of us did 3 Covid tests and after getting the negative result I did the work of visa and tickets. We also took Covid insurance and the use of sanitizer and mask is also done. Risk and fear will be there but we will complete our shoot by following all the safety measures."

Prarthana Behere had given some glimpse of this film to her fans by posting some pictures online. Talking about the film she said, "Before heading towards London all the crew had done their Covid tests and after getting the results negative we got the permission to go to London. The changes and effects which corona has done in everyone's life were seen at the airport as the whole atmosphere was completely changed. All the safety measures were also been followed in-plane, as I was the only passenger on the 3 seat row. Another benefit of shooting here is that people are less so social distancing is followed very well and the use of mask and sanitizer is also being done."

Rinku Rajguru will also be seen in his film which will in Marathi & Hindi. This will be Rinku's first foreign travel due to this film. "My journey from Mumbai to London was filled with excitement. It was good to see that all the safety measures being followed at both the airports & I will also follow safety measures everywhere," said Rinku Rajguru.

Talking about the film's shoot Suvrat Joshi said, "Shooting experience was very different in this current scenario. We all follow safety measures while shooting & free time as well. Our whole team is always traveling together as a group and we only have permission to travel from Hotel to set and set to Hotel so there is no risk and each one of us follows safety measures."

Nitin Prakash Vaidya's upcoming film ' Choomantar' with this strong star cast will increase craze among fans.

No comments:

Post a Comment