Thursday, 1 October 2020

Zee Talkies | WTP of Daah | अभिनेत्री सायली संजीव हिच्या 'दाह' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर

 मर्मस्पर्शी चित्रपट 'दाह' या रविवारी झी टॉकीज वर प्रेक्षकांच्या भेटीस

झी टॉकीजने कायमच आपल्या प्रेक्षकांना वेग वेगळ्या सिनेमांची मेजवानी देऊन मनोरंजित केलं आहे. सायली संजीव हिची प्रमुख भूमिका असलेला 'दाह' सिनेमा झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. रविवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा सिनेमा झी टॉकीज वर  प्रदर्शित होणार आहे.
जगण्यासाठी नाती महत्त्वपूर्ण असतात. नातेसंबंधातील कोमलता आपल्याला आयुष्यातील संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य देते. हा संदेश आपल्याला दाह एक मर्मस्पर्शी कथा..  या सिनेमामधून मिळतो. या चित्रपटात सायली संजीव सोबत, सुहृद वार्डेकर, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, यतीन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौगुले यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 
'दाह' या चित्रपटाची कथा दिशा (सायली संजीव) या व्यक्तिरेखेभोवती फिरते. मेडीकलच्या शेवटच्या वर्षाला ती शिकतेय. सुप्रसिद्ध डॉक्टर साने (डॉ. गिरीश ओक) आणि अनघा साने (राधिका विद्यासागर) यांची मुलगी. दिशा ही साने कुटुंबीयांची दत्तक मुलगी आहे. परंतु ही बाब स्वतः दिशा आणि तिच्या आईला म्हणजेच अनघा साने हिला देखील माहित नाही. दिशा आणि तिचा मित्र डॉ. समीर भोसले (सुहृद वार्डेकर) एकमेकांच्या प्रेमात पडतात.  समीर आणि दिशाच्या लग्नाची बोलणी सुरु होते. सर्व सुरळीत सुरु असताना समीरच्या घरच्यांकडून अचानक लग्नाला विरोध दर्शवला जातो. पण, या विरोधाचं कारण काय? अमेरिकेला गेलेला समीर पुन्हा भारतात येतो का? समीर आणि दिशा यांचं लग्न होतं का? दिशा साने कुटुंबाची दत्तक मुलगी आहे ही सत्य परिस्थिती तिला समजते का? दिशा आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पुढे काय करते? या सगळ्याची उत्तरं 'दाह' सिनेमात दडलेली आहेत. पाहायला विसरु नका दाह रविवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
Watch World Television Premiere of 'Daah' only on Zee Talkies 
/
Zee Talkies to air World Television Premiere of Sayali Sanjeev starrer 'Daah'
Zee Talkies is enthralling its viewers with an interesting line up of movies.  The channel is presenting blockbuster movies to keep the audience hooked on their TV screens. The channel is all set for the World Television Premiere of Sayali Sanjeev starrer ‘Daah’ on Zee Talkies this Sunday at 12 and 6 PM.
Relations are crucial for survival. The tenderness of a relationship gives you the strength you need to face the roughness in life. These relations can be related or non-related, they are infused with love, patience, and care.  ‘Daah - Ek Marmasparshi Katha' is a story about relationships and a tragedy that the protagonist suffer.
Along with Sayali Sanjeev, Suhrud Wardekar, Girish Oak, Radhika Vidyasagar, Yatin Karyekar, Uma Sardeshmukh, and Kishor Chougule have played key roles in the film.
‘Daaha’ being a family drama, is a story of a down to earth couple who face a tragedy. The status of their daughter’s Disha's (played by Sayali Sanjeev) birth remains a mystery. She lives with her parents, Dr. Sane and Anagha and in love with Sameer (played by Suhrud). When the respective families of Disha and Sameer begin to discuss their wedding plans, Dr Sane finds no choice but to reveal the secret about Disha’s identity which he has managed to keep under wraps, hidden from his wife as well as Disha herself. Once the secret is out, trouble begins.
Directed by Malhar Ganesh, the makers described the film in an official statement saying, “The film focuses on the importance of various relationships and looks at its different facets. The film gives a message that there is no difference between ours and theirs when it comes to relationships as we show affection and love in all of them.”  
To find out if Disha really is adopted or not and how the family accepts this news, dont forget to watch the World Television Premiere of Daah on Sunday, 4th Oct at 12 Noon and 6 PM only on Zee Talkies  

No comments:

Post a Comment