लाव रे तो व्हिडीओ या कार्यक्रमात या सुप्रसिद्ध अभिनेत्याने धरला लावणीच्या ठेक्यावर ताल
व्हिडीओ पाहून प्रेक्षक देखील झाले अवाक
झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ झी युवा वाहिनीने लाव रे तो व्हिडीओ या कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून दिलं आहे. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरच्या घरी व्हिडिओज शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेक जण घेतायत. या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे हा कार्यक्रम कलाकारांचा देखील आवडता झालाय.
नुकत्याच सिलेब्रिटी स्पेशल भागात एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने नऊवारी साडी नेसून धमाकेदार लावणी सादर केली. त्याच्या नृत्याने उपस्थितांचीही मनं जिंकली. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रेक्षकांचा लाडका पुष्कर जोग होता. पुष्करची लावणी पाहून प्रेक्षक देखील अवाक झाले. त्याच्या या धमाकेदार सदारीकरणानंतर टाळ्या आणि शिट्या देखील वाजल्या असतील यात शंकाच नाही. असेच उत्तमोत्तम व्हिडीओज सादर करून भरगोस मनोरंजन करणारा कार्यक्रम लाव रे तो व्हिडीओ पाहायला विसरू नका फक्त झी युवा वाहिनीवर.
No comments:
Post a Comment