Tuesday 5 January 2021

Zee Talkies - Missed call var Malamal

 २०२१ची धमाकेदार सुरुवात झी टॉकीजच्या 'मिस्ड कॉल वर मालामाल' स्पर्धेसोबत

२०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच न विसरण्यासारखं होतं. २०२० ला मागे सारत आपण सर्वांनीच २०२१ या नवीन वर्षाचं हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केलं. या नवीन वर्षात झी टॉकीजने सर्वांचे उदास चेहरे आनंदी करण्यासाठी एका विशेष स्पर्धेचे आयोजन केलंय. झी टॉकीज हि वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या पैसे  कमावण्याची आणि मालामाल होण्याची एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. 'मिस्ड कॉल वर मालामाल' या अनोख्या प्रश्नमंजुषाद्वारे घरबसल्या प्रेक्षक आता मालामाल होऊ शकता
१ तारखे पासून या प्रश्नमंजुषेला सुरुवात झाली असून ३१ जानेवारीला याचा शेवट होणार आहे. तब्बल १ महिना ६३० पेक्षा अधिक स्पर्धकांना या स्पर्धेद्वारे पैसे जिंकण्याची संधी झी टॉकीज प्रेक्षकांना देणार आहे. दररोज संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ४ सोप्पे प्रश्न झी टॉकीज वर दाखवण्यात येणार आहेत. प्रेक्षकांना फक्त  योग्य उत्तराशी जोडलेल्या नंबरवर एक मिस कॉल द्यायचा आहे. प्रत्येक भाग्यवान विजेत्याला दररोज रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. आता पर्यंत या स्पर्धेत १०० पेक्षा अधिक प्रेक्षक विजयी ठरले असून त्यांनी घर बसल्या रोख रक्कम जिंकली आहे. त्यामुळे तुम्ही कसली वाट बघताय? लवकर या स्पर्धेत सहभागी व्हा आणि घरबसल्या रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळवा. विजेत्यांची नावं झी टॉकीजवर ७ जानेवारी पासून प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यामुळे रोज पहा झी टॉकीज आणि व्हा मालामाल. या स्पर्धेत कसं सहभागी व्हायचं याच्या सूचना झी टॉकीजच्या सोशल मीडियावर तुम्ही पाहू शकता.  
मालामाल होण्यासाठी आणि या वर्षाचा सुरुवात आनंदी करण्यासाठी भाग घ्यायाला विसरूनका मिस्ड कॉल वर मालामाल फक्त आपल्या झी टॉकीजवर

No comments:

Post a Comment