Tuesday, 18 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १५ ! किरण - विकासच्या मैत्रीत पडणार फुट ? आता मला एकटं व्हायचे आहे - किरण माने

मुंबई १८ ऑक्टोबर, २०२२ : किरण माने आणि विकास हे दोघे बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासून एकत्र. कितीहि कोणी त्यांच्याविरोधात बोले, विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरीदेखील यांची मैत्री तुटली नाही. एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला. पण, आज मात्र त्यांची  मैत्री तुटणार का ? असं वाटतं आहे. विकासने  खडसावुन सांगितले आता मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही तिथे माझ्यासाठी उभे पण नाही राहिलात. किरण माने यांचे म्हणणे आहे आता मला एकटं व्हायचे आहे. विकास किरण माने यांच्या या म्हणण्यावर दुखावला गेला, दादा मला वाईट वाटतं आहे तिथे कोण नव्हतं तुम्ही होते. किरण म्हणाले, राग काढ माझ्यावर स्वतःला त्रास करून नको घेऊस. बघूया पुढे नक्की काय होणार ते आजच्या भागात.

अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. 

No comments:

Post a Comment