Monday 10 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ७ ! माझं नावं कानफाट्या ठेवा आता - अपूर्वा !

मुंबई १० ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मज्जा मस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. कोण आहे कानफाट्या अपूर्वा का म्हणते आहे माझं नावं कानफाट्या ठेवा आता ... झालं असं रोहितने समृद्धीला विचारले तुझा आज बुबू बघितला नाही... त्यावर समृद्धीचे म्हणणे पडलेत्याला बरं नाही वाटतं आहे झोपला आहे त्याला अपूर्वाची नजर लागली आहेसारखी चिमटे काढत असते त्याला. त्यावर अपूर्वा म्हणाली, "झालं त्याला पण माझीच नजर लागली. कानफाट्या नावं ठेवलं आहे माझं. तिथल्या नेमप्लेट वरील माझं नावं बदलून कानफाट्या ठेवा. काही झालं तरी घुमून फिरून माझ्यावरचं येते आहे.

बघूया आजच्या भागात अजून आय काय घडलं. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर. 

No comments:

Post a Comment