मुंबई १४ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडणार आहे नॉमिनेशन कार्य "फटा पोश्टर निकला झिरो".ज्याबद्दल किरण माने आणि तेजस्विनी मध्ये चर्चा होताना दिसणार आहे. किरण माने तेजस्विनीला सांगताना दिसणार आहे, "मी विकासला सांगितलं आहे, माझ्या अटी पूर्ण झाल्या नाहीतर मी त्याला देखील नॉमिनेट करणार... तिथे मित्र नाही कि कोणी नाही…तो आता माझ्यासाठी झटतो आहे. माझी एक अट आहे, योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो. आणि हे पूर्ण नाही झालं तर विकास नॉमिनेट झाला तरी मला हरकत नाही”. तेजस्विनी तिची बाजू मांडताना म्हणताना दिसणार आहे, "माझं तुमच्याशी असं काही वैयक्तिक नाहीये. योगेशने प्रसादला नॉमिनेट करावं हे वेगळे आहे... जर तुम्ही तसं नाही तर मला विकासाला नाईलाजाने नॉमिनेट करावं लागेल”. त्यावर किरण यांचे म्हणणे आहे, "पण हीच माझी डील आहे." आता किरण यांच्या डीलमुळे विकास नॉमिनेट होईल ? कि तेजस्विनी योगेशला सांगून प्रसादला नॉमिनेट करवेल. बघूया या सगळ्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होईल ? आणि कोण सेफ होईल ? किरण आणि विकासच्या यांच्या मैत्रीत दुरावा येईल ?
हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे बघूया आजच्या भागामध्ये.
No comments:
Post a Comment