Thursday, 11 April 2019

Six Elements Art Exhibition to be attended by Guru Swaroop Shrivsatava - ‘सिक्स एलिमेंट्स कला प्रदर्शनाला’ कलाप्रेमी गुरु स्वरूप श्रीवास्तव यांची उपस्थिती लाभणार!



“Ladies are the better artist in the World”  - Guru Swaroop Shrivastava
It is said that the programme that starts well ends well.  The same thing was experienced by the lady artists Kanchan Mahante, Puja Anand, Nimisha Bhansali, Swati Rakhonde, Vishakha Thakkar, who are housewife and artists by hobby.  Their exhibition named Sixth Elements was inaugurated by Ex police commissioner Datta Padsalgikar. To make its last day memorial one, on the closing day of it whose who from the art industry Guru Swaroop Shrivastava will be present.    

This exhibition is organized during 9th to 15th April at Neheru Centre, Worli and it has received a good response from the crowd.  Swaroop Udyog Samuha has organized this art exhibition which brings these five women who has given peace messages through their paintings.  We will support these ladies and help them for their success. We will surely try to buy these paintings with corporate rate.  The paintings will be sold to Scientiests, Economists, corporate and Art enthusiasts. Guru Swaroop Shirvastava has agreed to come to our exhibition is one of the greatest things for us , all five artists expressed.

Guru Swaroop Shrivastava is a Gold Medalist from IIT (Delhi) and he is having a hoby of collecting paintings.  He has financed Marathi Movie Shwas and Hindi Movie Krish.  Guru Swaroop Shrivastava is a well known art lover, Entrepreneur, Economist, Social Activist. He has received felicitations from Rotary club Delhi, and Rashtriya Ratna award and Udyog Ratna Shiromani award, Live Time Achievement Award by Delhi Government.  His name was published in Limca book of records for his contribution in the field of Art.  His achievements underlines that his presence in closing ceremony of this exhibition is a special programme.  His presence will be one of the greatest memories for us.  Said Kanchan Mahante.

Guru Swaroop Shrivastava Said “ Indian art is progressive at par to the international art community.  The Art provided by these artist is commendable.  I love Indian Artists.  I am a true lover of M.F. Husain paintings. I have created history by paying the highest amount to those paintings.  I think others should also stand with our artists and support them for their endeavor. These lady artists has creative minds and they are providing message of peace to the world.  They have taken a lot of efforts to reach this mark.  This is remarkable that after taking care of their houses they have achieved this landmark.”  He further said “  Colours were the main feature of Hussain Sahab.  He used use amazing colours. Therefore, his paintings were amazing and aggressive.  Therefore, they were controversial also.  But we can see soothing colour combination in Buddha Arts. It is their soul. Our Country India is a peace loving nation.  With the help of  Buddha Arts these five artists has created good art.
महिला कलावंतांमध्ये सर्वश्रेष्ठ कलागुण! - गुरु स्वरूप श्रीवास्तव
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात चांगली झाली तर त्याच्या शेवटही चांगलाच होतो असे म्हटले जाते. अगदी असाच अनुभव गृहसंसार सांभाळून आपली हॉबी विकसित करणाऱ्या कांचन महंते, पूजा आनंद, निमिषा भन्साळी, स्वाती राखोंडे, विशाखा ठक्कर या गृहिणींना अनुभवला आला आहे. त्यांच्या‘सिक्स एलिमेंट्स’ या कला प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते झालं आता या प्रदर्शनाचा शेवटही संस्मरणीय ठरावा म्हणून या प्रदर्शनाच्या ‘सांगता समारंभाला’ भारतीय कला आणि कलावंतांसाठी बुलंद योगदान देणारे दस्तुरखुद्द गुरु स्वरूप श्रीवास्तव यांची उपस्थिती लाभणार असल्याने, या प्रदर्शनाला विशेष महत्व प्राप्त झाले.
दिनांक ९ ते १५ एप्रिल दरम्यान नेहरू सेंटर, वरळी येथे सुरु असलेल्या या प्रदर्शन सोहळयाला कलारसिकांनी विशेष गर्दी करायला सुरुवात केली आहे. ‘स्वरूप उद्योग समूहा’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कला प्रदर्शनातून जगासमोर या पाच महिला कलावंतांनी तयार केलेल्या पेंटींग्जद्वारे विश्वशांतीचा संदेश दिला आहे. आम्हा नवोदित कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी मदत जाहीर करून प्रदर्शनाच्या ‘सांगता सोहळ्या’साठी भारतातील कलावंतांच्या पेंटिंग्जची सर्वाधिक विक्रमी रक्कमेत, कॉर्पोरेट पद्दतीने खरेदी करून भारतीय कलेची आणि कलावंतांची पारख करणारे खरे जोहरी अर्थातच विज्ञानतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, उद्योजक व जाणकार कलातज्ञ म्हणजे दस्तुरखुद्द गुरु स्वरूप श्रीवास्तव यांनी होकार दिला ही बाब आमच्यासाठी खूप मोठ्ठी आहे, असे या पाचही कलावंतांनी व्यक्त केले.
गुरु स्वरूप श्रीवास्तव हे आयआयटी(दिल्ही), चे गोल्ड मेडॅलिस्ट असून ते वेगवेगळ्या दुर्मिळ पेंटिंगचे जतन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठी चित्रपट ‘श्वास’ व हिंदीतील ‘क्रिश’ चित्रपटांसाठी आर्थिक पुरवठा केला आहे. गुरु स्वरूप श्रीवास्तव हे कलारसिक, तज्ञ, विज्ञानाधिष्ठ उद्योगपती, अर्थतज्ञ, समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. त्यांना रोटरी क्लब, तसेच बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्ली सरकारच्या वतीने ‘राष्ट्रीय रत्न’ तसेच ‘उद्योग रत्न शिरोमणी’, ‘लाईफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड’ने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर कलाक्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ही जाहीर झालेला आहे. अशी अष्टपैलू व्यक्ती सामान्य गृहिणींच्या प्रदर्शनाच्या सांगता समारंभाला विशेष अतिथी म्हणून येण्याचे मान्य करते ही गोष्ट आमच्यासाठी विशेष असून, प्रदर्शनानंतरही आमच्यासोबत या दरम्यानच्या गोड आठवणी आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील असे कांचन महंते यांनी सांगितले.
गुरु स्वरूप श्रीवास्तव म्हणाले, जगभरातील कलाप्रकारांमध्ये भारतीय कला सर्वाधिक प्रगत असून आपल्या कलावंतांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. मी भारतीय कलाप्रकारांवर निस्सीम प्रेम करतो. भारतीय जगविख्यात कलावंत एम. एफ. हुस्सेन यांच्या दुर्मिळ पेंटिंगचा मी भोक्ता असून, त्यांच्या पेंटिंग्जला सर्वाधिक आर्थिक मोल देऊन मी जरी इतिहास रचला असला, तरी इतरांनीही असेच कलावंतांच्या पाठीशी उभे राहावे, त्यांच्या नव्या कल्पनांना भराऱ्या घेण्यासाठी पाठबळ पुरवावे. या प्रदर्शांत सहभागी महिला कलावंतांनी अतिशय कल्पक आणि जगाला अवश्यक असलेल्या शांतीचा संदेश देणाऱ्या सुंदर कलाकृतींनी निर्मिती केली आहे. या स्त्री कलावंतांनी अपार मेहनतीने या कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. त्यांच्या कलाकृती या कला प्रदर्शनात पोहचण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली आहे. आपलं घर- संसार सांभाळून ही कला संभाळण खूप अवघड काम आहे. पुढे बोलताना गुरु स्वरूप श्रीवास्तव म्हणाले कि हुसेन साहेबांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे रंग. ते विलक्षण रंग वापरत. त्यामुळे त्यांची पेंटिंग आक्रमक असत व त्यामुळे ती वादग्रस्त होत. पण ‘बुद्धा आर्ट’मध्ये शांतीप्रिय रंगसंगती पहायला मिळते, तिचा तो आत्मा आहे. आपला भारतदेश शांतीप्रिय आहे. ‘बुद्धा आर्ट’च्या माध्यमातून या पाचही प्रतिभावंतांनी अप्रतिम कलाविष्कार घडवला आहे.

No comments:

Post a Comment