Tuesday, 30 April 2019

बिग बॉस मराठीमधील महेश मांजरेकरांचा एक वेगळा अंदाज ...

मुंबई ३० एप्रिल२०१९ : जनजागृतीलोकशिक्षणपुराण कथेतून संस्कृती दर्शन आणि थोर परंपरेची जाणीव करून देणारा अतिशय सशक्त लोककलेचा प्रकार म्हणजे कीर्तन. आणि कीर्तनकार हा मुळातच पुराण इतिहासातील आदर्श दाखले देऊन आजच्या समाजाला कस वागावंकस जगावंहे कानपिचक्या देऊन शिकवतो. हे सांगण्याचा उद्देश असा कि, बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर कीर्तनकाराच्या रुपात दिसणार आहेत... बिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर आले. आता जर असे विविध क्षेत्रातील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य म्हणून आले तर काय होईल हे बघणे रंजक असणार आहे...
या सीझनमध्ये अजून कोण कोणते सरप्राईज प्रेक्षकांना मिळणार आहेत हे जाणून घेण्यसाठी बघत रहा बिग बॉस मराठी!

No comments:

Post a comment