Tuesday 30 April 2019

इतिहासाच्या सुवर्ण पानांत दडलेली पहिली सर्जिकल स्ट्राईक... फत्तेशिकस्त

'फर्जंदचित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेतयुवा पिढीला आपल्याअलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून आकारास आलेल्या 'फर्जंद'ने तिकीटबारीचे मैदान मारत हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवली होती. 'फर्जंदनंतर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा 'फत्तेशिकस्तलवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असूनपन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे आणि लगेचच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
कुशाग्र बुद्धिमत्ताभौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समजदूरदृष्टीकालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठ्याचलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहिम फत्ते केलीआलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत 'फत्तेशिकस्तहा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्याअशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहेअलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्यायुद्धनीतीमध्येच रुजलेली आहेतअसं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'फत्तेशिकस्तया आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारा आपल्याला अशाच एकाअतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.
मृणाल कुलकर्णीचिन्मय मांडलेकरनिखिल राऊतहरीश दुधाडेअजय पुरकरअंकित मोहनसमीर धर्माधिकारीमृण्मयी देशपांडेआस्ताद काळेतृप्तीतोरडमलरमेश परदेशीनक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी 'फत्तेशिकस्त'च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहेशिवाय हिंदीचित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
असं म्हणतात की सुकर भविष्यासाठी भूतकाळाची पानं उलगडणं गरजेची असतातइतिहास हा असा दुवा आहे जो आपल्याला तत्कालीन घटनांशी जोडूनठेवतोआणि हा दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर पराक्रमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.  अशाच एका शिवकालीनरोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून देणारा 'फत्तेशिकस्तआपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय.

No comments:

Post a Comment