The birth centenary year of Dr Vasantrao Deshpande, renowned Hindustani classical vocalist and Marathi stage artist, who left indelible impression on theatre and films with his immemorable compositions including “Bandish”, “Thumri” and “Natya Sangeet” and ruled the hearts of music lovers, begins from 2nd May 2019.
The work of his Vasantrao’s disciple Pandit Chandrakant Limaye and his bondage towards his “Guru”, is well known. As such it would have been surprise if Limaye was not to take initiative to organise master class programs on the occasion of Dr Deshpande’s birth anniversary.
Pandit Limaye, had set up the Vasantrao Deshpande Sangeet Sabha (VDSS) in 2000, to continue the legacy and cultural heritage of his Guru, who had command over “surs”, purity in singing and had capacity to captivate listeners with his mercurial and dramatic style of singing. To revive the memories of Vasantrao and take forward his heritage, Pandit Limaye has organised different programs.
Pandit Limaye is the chief trustee of the VDSS, which has organised inaugural program on 5 May 2019, from 5 PM to 10 PM at Ravindra Natya Mandir, Prabhadevi. A special souvenir dedicated to Vasantrao will also be released in the program. Achyut Godbole, Pandit Shankar Abhyankar, Pandit Satyasheel Deshpande, Faiyyaz, former Police Commissioner Arvind Inamdar, former Lok Sabha Speaker and Maharashtra Chief Minister Manohar Joshi and others will be present. The speakers will revive the memories of Vasantrao on the occasion.
As part of the function, a special program titled “Vasant Bahar”, throwing light on Vasantrao’s singing, will be staged. Pandit Limaye will perform with his disciples, the immemorable compositions of Vasantrao, including “Bandish”, “Thumri”, “Natya Sangeet” and film music, in an audio visual program. The audience will also get the opportunity to enjoy the songs by Nupur Kashid-Gadgil (Gwalior gharana) and Padmbhushan Pandita Prabha Atre. This program has been kept free for the audience on the occasion of birth centenary.
The programs will be organised by VDSS also in Pune, Kolhapur, Sangli, Nashik, Solapur, Belgaon and Goa on the occasion of the birth centenary. Besides, workshops will also be organised.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्यामनावर अधिराज्य गाजवले ते डॉ. वसंतराव देशपांडे. ज्यांनी बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचाअमीट ठसा उमटवला. असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व डॉ वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ०२ मे २०१९ पासून सुरु होत आहे. त्यांचेपट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांचं संगीत क्षेत्रातलं कार्य आणि गुरु प्रेम सर्वांना परिचित आहे. त्यांनी या निमित्तानं दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले नसते तरच नवल!
डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य पं.चंद्रकांत लिमये यांनी २००० साली वसंतराव देशपांडे संगीत सभेची स्थापना केली. वसंतरावांची गायकी, लय-सुरांवरचंप्रभुत्व, गाण्यातला शास्त्रशुद्धपणा, आवाजातला गोडवा, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद हा समृद्ध वारसा पुढे अविरत सुरू रहावा हा या संगीत सभेचामूळ उद्देश. तो पं. लिमये यांनी मनोभावे जपला. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि वसंतरावांच्या कर्तृत्वाचे पुण्यसमरण करण्याच्या हेतूने पं. लिमये यांनीजन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये असून संगीत सभेने दि. ५ मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवच्या शुभारंभाचा सोहळा रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत आयोजित केला आहे. या दिवशी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी श्री. अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, श्रीमती फैयाज, माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार, माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.
यानंतर 'वसंत बहार' हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातुन उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका श्रीमती नुपूर काशीद-गाडगीळ व पद्मभूषण पंडिता प्रभाताई अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम जन्मशताब्दी निमित्त सर्व रसिकांसाठी विनामुल्य ठेवला आहे.
जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशीक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment