Friday 21 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस २६ ! घरामध्ये सुरु आहे एक डाव धोबीपछाड साप्ताहिक कार्य कुठली टीम साप्ताहिक कार्यात मारणार बाजी ?

मुंबई २१ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरु आहे... ज्यामध्ये सदस्य पुर्णपणे साम दाम दंड भेद यांचा चातुर्याने उपयोग करून टास्क जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत... काल या टास्क मध्ये विणाची टीम विजेती ठरली... विणाच्या टीमने चातुर्याने काल या टास्क मध्ये विजय मिळवला... आज देखील विणा आणि पराग मॅनेजर असून आज हे दोघे कुठल्या योजना आखून टास्क जिंकतील हे बघणे रंजक असणार आहे... काल नेहा, पराग VS शिव अशी खडाजंगी बघयला मिळालीज्यामध्ये नंतर परागची तब्येत देखील थोडी बिघडली... यामध्येच शिवने विरोधी टीमची ईस्त्री चोरली... आज देखील टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीम मध्ये चुरस बघायला मिळणार आहे. आज दोन्ही टीम बळाचा वापर करताना दिसणार आहेत... आणि ज्यामुळेच संचालिकेने म्हणजेच वैशालीने “मी दोन्ही टीमला Disqualify करत आहे असे जाहीर केले”आता हे साप्ताहिक कार्य कसे पुढे जाणार हे बघणे रंजक असणार आहे.
घरामध्ये टास्क बरोबरच सदस्यांमध्ये बरीच मस्ती देखील होत असते... आज सगळे सदस्य मिळून अभिजीत बिचुकले यांना पाण्यामध्ये टाकणार आहेत...

No comments:

Post a Comment