मुंबई २० जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे... आणि याच टास्क दरम्यान एकमेकांच्या टीमला हरविण्यासाठी सदस्य बऱ्याच योजन आखताना दिसत आहेत... काल बिग बॉसनी सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येक टीम त्यांना पटेल त्याप्रमाणे योजना आखून दुसऱ्या टीमला मात देण्याच्या प्रयत्नात आहेत... प्रत्येक टीम ने दुसऱ्या टीमच्या मॅनेजरकडून त्या टीमने तयार केलेले कपडे Approve करून घ्यायचे आहे... हेच लक्षात घेता धुतलेले कपडे वाळवल्यानंतर त्याला इस्त्री करून तयार करायचे आहेत... आणि हेच लक्षात घेता शिवने विरोधी टीमची इस्त्री चोरणार आहे... आता हि इस्त्री ते कसे परत मिळवतील ? बळाचा वापर करून कि युक्तीचा वापर करू हे प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच...
तसेच नेहाचे असे म्हणणे असणार आहे विरोधी टीमचा मॅनेजर नसल्याने आमच्या टीमला विजेती टीम म्हणून घोषित करा... तर शिवने ही संधी देखील न दवडता त्याला उत्तर दिले “तुम्ही खेळू नका” तर यावर नेहाने देखील उत्तर दिले “टीम ब्रेकर” आता हे नक्की कोणासाठी होते ?
No comments:
Post a Comment