मुंबई ५ जून, २०१९ : बिग बॉसच्या कुठल्या क्षणी काय होईल ? कोण कोणाचं मित्र बनेल आणि कधी कोणाच दुश्मन हे काहीच सांगता येत नाही... पोपटाचा पिंजरा या तस्क मध्ये शिवानी आणि शिव मध्ये काल चांगलाच वाद रंगला तो म्हणजे कोण कोणाचा पक्षी पिंजरा मध्ये टाकणार .... आणि परागने शेवटी वादाला कंटाळून नेहाला नॉमिनेट केले म्हणजे या आठवड्यामध्ये नेहा, अभिजीत केळकर, वीणा जगताप, पराग कान्हेरे, मैथ्थीलि जावकर, माधव देवचके हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले आहेत.. बघू आता कोणत्या सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो...
...बिग बॉस मराठीच्या घरात रंगतो आहे चोर बाजार टास्क
बिग बॉसनी काल सदस्यांना चोर बाजार हे साप्ताहिक कार्य दिले ज्यामध्ये घर पुन्हा वेगळ्या दोन टीममध्ये विभागले गेले... आज अभिजीत बिचुकले टास्कमध्ये त्यांच्या सामानावरून गोंधळलेले दिसणार आहेत ...बिचुकलेंनी शूज आणि साबाणबद्दल काय डील केली आहे ? बाप्पा का म्हणत आहे बिचुकलेंनी साबाणाची डील केली आहे ? तर किशोरीजी त्यांना सांगत आहेत तुम्ही तुमचे शूज घेऊन या नाही तर ते स्टोर रूम मध्ये ठेवतील... कारण या टास्क मध्ये जे सामान दुकानदार विकत घेतील ते सामान घरात राहील आणि जे सामान स्टोर रुममध्ये जाईल ते बिग बॉसच्या घरात सिझन संपेपर्यंत परतणार नाही...
काल चोर आणि पोलिसांमध्ये हा गेम चांगलाच रंगला... चोरांनी बऱ्याच गोष्टी दुकानदारांना विकल्या आता या टास्क मध्ये आज काय होणार हे बघणे रंजक असणार आहे... या टास्क दरम्यान पराग आणि शिवानी मध्ये पुन्हाएकदा बाचाबाची झाली... आणि शिवानीने पराग वर हात उचलला... माधव,मैथिली, शिव आणि विद्याधर यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला... परागने काल बिग बॉसला सांगितले जर शिवानी हा टास्क खेळणार असेल तर मी खेळणार नाही... आणि परागने या टास्क मधून काढता पाय घेतला... पुढे या टास्क मध्ये काय होईल हे आज बघा बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये...
...अभिजीत केळकर वीणावर मारतो आहे लाईन ?
चोर बाजार या टास्क मध्ये आज वीणा पोलिस तर अभिजित केळकर चोर आहे... पोलिसापासून सुटण्यासाठी अभिजीत शक्कल लढवत आहेत... तर किशोरी शहाणे आणि इतर सदस्य या गोष्टीची गंमत घेत आहेत... अभिजीतने पोलिसावर म्हणजेच वीणावर लाईन मारण्याचा प्रयत्न करतो आहे... टास्क दरम्यान अशी बरीच गमंत सदस्यांमध्ये बघायला मिळते... अभिजीत केळकरची ही युक्ती त्याच्या किती उपयोगी पडते आज कळेलच...
तेंव्हा नक्की बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment