मुंबई १० जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये ग्रुप तयार होत
झाले आहेत... किशोरी, पराग, रुपाली,विणा तर शिवसुध्दा आता त्यांच्या
ग्रुपमध्ये आहे असे दिसून येत आहे... घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बोलतच
असतात... त्यांना न पटणाऱ्या गोष्टी तर कधी एका सदस्याला दुसऱ्या सदस्याविषयी भडकवत
असतात... पण, या गोष्टी कधी ईतर सदस्यांपासून
लपतात तर कधी त्या सदस्यासमोर येतात ज्या सदस्याविषयी अमुकएक सदस्य बोलला आहे...
असचं काहीसं शिव आणि अभिजीत केळकरच झाल आहे. या दोघांविषयी माधव बोलला असून ते
शिवला कळाले आहे... ज्यावरून शिव आणि माधवमध्ये वाद होणार आहे... माधवने अभिजीत
केळकरला सांगितले कि, “शिववर विश्वास ठेऊ नकोस” आणि शिवला म्हणाला “अभिजीतवर विश्वास ठेऊ नकोस”.तर
शिवला तो असेही म्हणाला कि, आपणसोबत छान गेम खेळू... आणि मागे जाऊन माधवच अस बोलण शिवला पटल नाही. आणि
समोरासमोर काय तो सोक्षमोक्ष लागावं म्हणून शिवने अभिजीतला बरोबर घेऊन माधवला जाब
विचारला. त्यावर माधवकडे काही कारण असेल का ? तो शिव आणि अभिजीतसमोर त्याची बाजू
कशी मांडेल ? शिवचे माधवला असे म्हणणे आहे कि, तू एक काय तरी ठरव, तुझ डोक खूप चालत आहे चालव पण
माझ्यासमोर चालवू नकोस”.
No comments:
Post a Comment