Sunday 23 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ - बिग बॉस मराठीच्या घरामधून विद्याधर जोशी बाहेर...


 
मुंबई २३ जून, २०१९ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या... मग घरामध्ये पार पडलेले एक डाव धोबीपछाड हा टास्क असो किंवा शेरास सव्वा शेर हा नॉमिनेशन टास्क असो. यावर सगळ्याच सदस्यांची कानउघडणी केली. बिग बॉस मराठीच्या घरामधून मागील आठवड्यामध्ये दिगंबर नाईक घराबाहेर पडले. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये विणा जगतापसुरेखा पुणेकर, विद्याधर जोशी, पराग कान्हेरेशिव ठाकरे हे नॉमिनेशनमध्ये होते ज्यामध्ये पराग कान्हेरे आणि विद्याधर जोशी डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये विद्याधर जोशी यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  
बिग बॉस मराठीच्या घरामधून विद्याधर जोशी घराबाहेर पडले याचे सगळ्याच सदस्यांना खूप भावूक झाले... विद्याधर जोशींना त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली... महेश मांजरेकर यांनी विद्याधर यांना एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला सेफ आणि अनसेफ करायचे होते. त्यांनी नेहा शितोळेला सेफ केले आणि कोणालाही अनसेफ करण्यास नकार दिला.
आजच्या भागामध्ये एक डाव धोबीपछाड या टास्कमध्ये वैशाली संपूर्ण टास्क टीम B च्याच बाजूने खेळली असे म्हणणे पडले. तर विणाकिशोरी आणि रुपाली यांचा KVR ग्रुप पहिल्या आठवड्यापासून घरामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. विणाचे यावर म्हणणे होते त्यांचा ग्रुप हीना, शिव कि पराग कोणी फोडला हा मुद्दाच नाहीये इतका ग्रुप विक आहे का कोणी एक येईल आणि तोडून जाईल यावरूनच पराग आणि विणामध्ये बरीच वादावादी झाली. एक डाव धोबीपछाड हा टास्क जर टीम B संचालिकाच्या मदतीशिवाय जिंकले असते तर विनर वाटले असते असे महेश मांजरेकर म्हणाले. तर वुट चुगली बूथमध्ये विणा, हीना, रुपाली यांना त्यांच्या चाहत्यांनी इतर सदस्यांबद्दल चुगली केली.
WEEKEND चा डावमध्ये म्हणी विषयी एक खेळ खेळण्यात आलाज्यामध्ये सदस्यांना विचारण्यात आलेली म्हण कोणत्या सदस्याला लागू पडते हे ओळखायचे होते... काना मागून आली आणि तिखट झाली हि म्हण हीनाला योग्य आहे असे रुपालीचे म्हणणे पडले. वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण वैशालीला तर बडी बडी बाते वडापाव खाते ही म्हण परागला योग्य आहे असे सर्वच सदस्य म्हणाले, उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण माधवला योग्य आहे असे सदस्यांनी सांगितले. तर वूट आरोपी कोण ?यावर पराग आरोपी आहे असे सांगितले तर परागला शिक्षा दिली कि त्याने विणा, रुपाली आणि किशोरीची माफी मागावी जी शिक्षा त्याने पूर्ण केली. तर यानंतर पराग आणि रुपाली तर शिव आणि विणाने डान्स सादर केला. यानंतर अजून एक गंमतीदार खेळ रंगला ज्यामध्ये सदस्यांना ऐकवण्यात आलेली गाणी कोणासाठी आहे हे ओळखायचे होते... ज्यामध्ये सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली...
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  

No comments:

Post a Comment