Photo caption: left to right
Photo - Dinesh Sinha of Ratna Books, Smita Karandikar, Prakash Bal Joshi, Arjun Dangle, Ranjit Hoskote & Sridhar Balan
The unveiling of book “Mirror in the Hall” written by Prakash Bal Joshi was held in Mumbai Marathi Patrakar Sangh. Renowned author Arjun Dangle, Poet Ranjit Hoskote, Translator Smita Karandikar, Ratna Books editor Dinesh Sinha, adviser Sridhar Balan and other dignitaries were present in this function. This award winning Marathi book is translated into English by Smita Karandikar & Ratna Books Delhi has published it. The award winning book, “Prakash Bal Joshi yanchya katha” is being translated into Hindi, Gujarati, French and Malayalam. This collection of fifteen short stories by Prakash Bal Joshi explores contemporary themes revolving around strained relationships, changing values and women empowerment among middle-class people in both rural and urban settings.
At that time the all dignitaries expressed opinions about the book "Mirror: In the Hall” On this occasion, Smita Karandikar, read out the message sent by senior author, poet Vasant Abaji Dahake. He said in that message, Prakash Bal Joshi has been writing stories since 1973. Even though the number of their stories are very less but those are remarkable, in his stories, He has focused on complexities of mind .Smita Karandikar, the translator, said that the characters in this story are normal but the way he has depicted them, they are become from ordinary to extraordinary.
Ranjit Hoskote said that translating in any languages is a very difficult task, but this book has been translated very well. Writer Arjun Dangle said that in this story the artist has a different language, and it appears in this book, and this story is also focus on a middle-class family, but each story has a different identity.
Talking about this book, Prakash Bal Joshi said, "Hehas been observing changes taking place in the society since last four decades and they reflect in his stories .Every person in these stories has been sketched by the author that every person is challenging the misery and difficulties of his or her life, without any the expectation of justice.
Prakash Bal Joshi has started his career from Kesari Newspaper in Pune. Last four decade he has done Journalism for newspapers Kesari, Free Press Journal, Indian Express, Times of India. He was a witness to the renowned movement, the drought of 1972, the communal riots, tribal children malnutrition, the bamani tour, the many elections and agitations. While pursuing journalism, he remained observant and nurtured the creative author within giving rise to many creative stories. "Gateway" and "Story of a Girlfriend" are some examples of creative expressions.
Photo caption: left to right
Photo - Ranjit Hoskote & Prakash Bal Joshi
प्रकाश बाळ जोशी लिखित “मिरर: इन दि हॉल” या पुस्तकाचा अनावरण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघात मोठ्या दिमाखात पारपडला. यावेळी सन्माननीय पाहुणे जेष्ठ लेखक, अर्जुन डांगळे, प्रमुख पाहुणे रणजित होस्कोटे अनुवादिका स्मिता करंदीकर, रत्ना बुक चेदिनेश सिन्हा, श्रीधर बालन, महेश विजापूरकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. या पुस्तकाचे लेखन जेष्ठ पत्रकार, कवी, चित्रकारप्रकाश बाळ जोशी यांनी केले असून त्याचा इंग्लिश अनुवाद स्मिता करंदीकर यांनी केला आहे व पुस्तक रत्ना बुक्स, दिल्ली, यांनीप्रकाशित केले आहे तसेच हे पुस्तक हिंदी, गुजराती, फ्रेंच, मलयालममध्येही अनुवादित होत आहे. "प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा”यामूळ मराठी पुस्तकाला उत्तम साहित्याचा २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या मूळ मराठी पुस्तकातील १५कथांचा इंग्रजी पुस्तकात समावेश करण्यात आला असून या पुस्तकात त्यांना अनुभवास आलेली ग्रामीण तथा शहरी भागात राहणारीमध्यमवर्गीय लोकं, त्यांची बदलेली मूल्ये, महिला सक्षमीकरण आदी विषयावर आधारित कथांचे संकलन यामध्ये करण्यात आले आहे.
यावेळी सन्माननीय पाहुण्यांनी "मिरर: इन दि हॉल" या पुस्तकाबद्दल आणि प्रकाश बाळ जोशींन बद्दल मते व्यक्त केली. या प्रसंगी जेष्ठ लेखक, कवी वसंत आबाजी डहाके यांनी पाठवलेला शुभेच्छापर संदेश स्मिता करंदीकर यांनी वाचून दाखविला,त्यात ते म्हणाले “प्रकाश बाळ जोशी १९७३ पासून कथा लिहीत आहेत. त्यामानाने त्यांच्या कथांची संख्या जरी कमी असली तरी जेवढ्या कथा आहेत त्या उल्लेखनिय आहेत. त्यांनी आपल्या कथेत मनातील गुंतातुंतीत लक्ष्य केंद्रित केले आहे.” अनुवादिका स्मिता करंदीकर म्हणाल्या या कथेमधील पात्रे सामान्य आहेत पण प्रकाश बाळ जोशी यांनी त्यांना ज्याप्रमाणे मांडले आहे त्यामुळे ती सामान्यातून असामान्यकडे जातात. रणजित होस्कोटे म्हणाले कोणत्याही भाषेचा अनुवाद करणे खूप कठीण काम असते पण हे पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने अनुवादित केले आहे. लेखक अर्जुन डांगळे म्हणाले या कथांमध्ये कलाकाराची वेगळी भाषा असते ती या पुस्तकात दिसून येते आहे तसेच या कथा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून सुद्धा प्रत्येक कथेमध्ये एक वेगळेपणा आहे. प्रकाश बाळ जोशींच्या कथा या मनातील वेध घेणाऱ्या कथा आहेत.
प्रकाश बाळ जोशी पुस्तकाविषयी बोलताना म्हणाले, या कथेत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संवेदनशील, कधीकधी व्यंग्यपूर्ण चित्रण,अनोखी परीक्षणे आणि जीवनातील संकटे, जीवनातील उतारचढाव मांडले आहेत. कथेतील संवेदनशीलता माणसांना अस्वस्थ करते त्यामुळेही कथा इतर कथांपेक्षा आपले वेगळे स्थान निर्माण करते. लेखकाने चित्रांतील प्रत्येक व्यक्ती ही अशी रेखाटली आहे की ती कथेतील प्रत्येकव्यक्ती कुठल्याही न्यायाच्या अपेक्षेशिवाय ते त्यांच्या आयुष्यातील दुःखाला व आव्हानला स्वीकारत पुढे जातात. कथेतून काय अर्थ घ्यावा हेलेखकाने वाचकांवर सोडून दिले आहे. प्रत्येक कथा वाचताना ती आपल्यासमोर घडते आहे असेच वाटते.
पुण्यातील सकाळ या वृत्तपत्राद्वारे पत्रकारितेला सुरुवात करून प्रकाश बाळ जोशी यांनी गेली चार दशके केसरी, फ्री प्रेस जर्नल, इंडिअनएक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रा पत्रकारिता केली आणि याच दरम्याने महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजून काढला. नामांतरचळवळ, १९७२ चा दुष्काळ, जातीय दंगली, आदिवासी मुलांचे कुपोषण, बामणी चा दौरा, अनेक निवडणुका आणि आंदोलनाचे ते प्रत्यक्षसाक्षीदार होते. पत्रकारिता करीत असतांनाच त्यांच्यातील सर्जनशील लेखकही जागा राहिला आणि त्यातूनच अनेक दीर्घ कथांचा जन्म झाला.गेटवे आणि मैत्रिणीची गोष्ट ही दोन पुस्तके त्याचे साक्षीदार आहेत.
No comments:
Post a Comment