मुंबई १४ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्यांची धूमधडाक्यात एंट्री झाली. पुन्हा एकदा घरामध्ये येऊन तिघेही खूप खुश होते... या तिन्ही सदस्यांनी पहिल्या पर्वामध्ये उत्तम प्रकारे टास्क पार पाडले... सदस्यांची जिंकण्याची जिद्द, बुध्दीचातुर्य प्रत्येक टास्कमध्ये दिसून यायचे... हे जुने सदस्य नव्या सदस्यांसोबत आज टास्क खेळणार आहेत... बघूया कोणाची टीम टास्क जिंकणार ? कसे हे जुने गाडी नव्या सदस्यांना मार्गदर्शन करणार ? आज घरामध्ये “जुना गडी नवं राज्य” हे साप्ताहिक कार्य पार पडणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घराचे रूपांतर एका राज्यात होणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य या राज्यातील रहिवाशी असतील. राणीला किंवा राजाला जिंकून देण्यासाठी राज्यातील रहिवाशी वेळोवेळी कार्यांचा सामना करून आपल्या राणीचा किंवा राजाचा झेंडा त्या भागावर रोवतील आणि याचसोबत ते त्या भागाचे रक्षण देखील करतील.
आता हे कार्य कसे रंगेल ? काय काय घडेल ? हे नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment