मराठी चित्रपट म्हटलं, की 'झी टॉकीज' हे नाव आपसूकच आठवतं. दर्जेदार भरपूर मनोरंजन करणारे, अनेक अप्रतिम मराठी चित्रपट या वाहिनीवर पाहायला मिळतात. म्हणूनच, 'झी टॉकीज' ही मराठी चित्रपटांसाठीची सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी आहे. जुन्या व नव्या चित्रपटांची मेजवानी 'झी टॉकीज'वर अनुभवायला मिळते. उत्तम मराठी चित्रपट पाहायचा असेल, तर झी टॉकीजची निवड प्रेक्षक करतात. या वाहिनीवर, रविवार १५ मार्च रोजी, 'गोल गोल गरा गरा' हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुशांत शेलार भाई दांडेकर ही भूमिका साकारत आहे.
भाई दांडेकर, हा दादा दांडेकर यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. आपल्या वडिलांविषयी त्याला नितांत आदर आहे. वडिलांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा निश्चय त्याने मनाशी केलेला आहे. त्यामुळेच स्त्रियांचा तिरस्कार करणाऱ्या दादांचा हा मुलगा, आजन्म ब्रह्मचारी राहणार आहे. भाईची भूमिका अभिनेता सुशांत शेलारने साकारली आहे. अलिबाग म्युन्सिपाल्टीमध्ये 'वॉटर डिपार्टमेंट'ला काम करणाऱ्या निर्मळ मनाच्या भाईची भूमिका सुशांतने अप्रतिमरित्या पार पाडली आहे. सुशांतचा हा ब्रम्हचारी अवतार प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल यात शंकाच नाही!!
दांडेकरांच्या घरातील हा ब्रह्मचारी भाई, 'गोल गोल गरा गरा'मध्ये काय काय धमाल करतो हे रविवारी १५ मार्च रोजी पाहायला मिळेल. ही धमाल आणि मजा अनुभवण्यासाठी, 'झी टॉकीज' पाहायला विसरू नका!
No comments:
Post a Comment