Sunday 12 July 2020

‘झिंगिवीर-एच’ कोरोनाचा प्रसार रोखू शकते


पीकेएचआयएल ने सादर केले ‘कोविड-१९’ वरील हर्बल औषध
मुंबई, १२ जुलै २०२०: ‘कोविड-१९’ बाधित रूग्णांवर घेतलेल्या ‘झिंगिवीर-एच’ या औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांचे आशादायक असे अंतरिम निष्कर्ष पंकजाकस्तुरी हर्बल्स इंडिया प्रा. लि.(पीकेएचआयएल)ने आज घोषित केले.‘पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाउंडेशन’ चे संस्थापक डॉ.जे.हरिंद्रन नायर यांनी विकसित केलेले, ‘झिंगिवीर-एच’ हे सात घटकांच्या मिश्रणाने बनविलेले एक वनस्पती-खनिज औषध आहे. ‘झिंगिवीर-एच’ बाबतची ही घोषणा करताना या कंपनीने, ‘कोविड-१९’ सारख्या गंभीर आजारावर आयुर्वेदामध्ये प्रभावी उपचारांच्या अनेक शक्यता आहेत, याचा पुनरुच्चार केला.
‘पीकेएचआयएल’ चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जे. हरिंद्रन नायर म्हणाले, “आज ‘कोविड-१९’च्या संकटाच्या काळामध्ये आपली रोगप्रतिबंधक शक्ती या आजाराशी लढण्यास कमी पडत आहे, अशा वेळी आयुर्वेदात प्रभावी, परवडणारे उपचार विकसित करण्याची शक्ती आहे, “झिंगिवीर-एच’ या औषधाचा रोगप्रतिबंधक औषध म्हणून उपयोग करता येईल, हे येथे विशेषकरून लक्षात घेतले पाहिजे. ‘झिंगिवीर-एच’ हे ‘कोविड-१९’ चा प्रसार रोखू शकते आणि त्याद्वारे समुदायांमध्ये हा आजार पसरण्यास अटकाव होऊ शकतो असे डॉ.नायर म्हणाले.”
‘पंकजाकस्तुरी’ च्या ‘झिंगिवीर-एच’ या नवीन औषधाच्या क्लिनिकल चाचण्या ११२ रूग्णांवर सहाय्यक उपचार पद्धत म्हणून घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे, इतर १३५ अतिरिक्त रूग्णांमध्ये एक स्वतंत्र उपचार म्हणून या औषधाचा प्रयोग ‘डबल ब्लाइंड’ अभ्यासाच्या रुपात करण्यात आला. सहाय्यक उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये औषधाच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी ४२ रूग्णांचे निकाल अंतरिम अहवाल म्हणून प्रसिद्ध केले जात आहेत. या ४२ रूग्णांपैकी २२ जणांवर ‘झिंगिवीर-एच’ ने आणि २० जणांवर ‘प्लेसबो’ ने उपचार करण्यात आले. ‘झिंगिवीर-एच’ औषधाचे उपचार झालेल्या सर्व २२ रुग्णांना ‘रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन’ (आरटी-पीसीआर) नंतर चौथ्या दिवशी सोडण्यात आले. ‘प्लेसबो’ स्वरुपाचे उपचार घेणारे २० रूग्ण पुढील ५ ते ११ दिवसांच्या काळात कोरोनाने बाधित राहिले.
‘झिंगिवीर-एच’च्या गोळ्यांना केरळ सरकारकडून औषधी परवाना मिळाला आहे, तसेच तिरुअनंतपुरम येथील ‘राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी’ तसेच ‘सीएसआयआर-एनआयआयएसटी’ येथे मानवी पेशींवर ‘सायटोटॉक्सिसिटी’ चाचणी या औषधाकरीता घेण्यात आलेल्या आहेत. प्राण्यांवर घेतलेल्या चाचण्या निरुपद्रवी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर, ‘क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’कडे (सीटीआरआय) क्लिनिकल चाचण्यांसाठी नोंदणीही करण्यात आली आहे. त्यानंतर, जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) ‘आयसीएच-जीसीपी’ मानकांनुसार, हे औषध ‘रॅन्डमाइझ्ड सिंगल ब्लाइंड प्लेसबो कंट्रोल्ड मल्टी--सेंटर क्लिनिकल ट्रायल’ साठी विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संबंधित नैतिक समित्यांच्या मंजुरीसह ठेवण्यात आले आहे. ‘डीएमसी’ ने आढावा घेतल्यानंतर, औषधाच्या चाचण्यांचे निकाल आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) या मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment