Friday 31 July 2020

Zee Talkies - Rakshabandhan Special movie lineup

रक्षाबंधन निमित्त झी टॉकीजवर 'तुला जपणार आहेचित्रपट महोत्सव

/

झी टॉकीज साजरा करणार बहीण भावाच्या नात्याचा उत्सव


भावाबहिण्याच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणारा धागा म्हणजे 'राखी'. भावा-बहिणींच्या नात्यावर आधारित असणारा रक्षाबंधन हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतोखास रक्षाबंधनाचे औचित्य साधून झी टॉकीज खास चित्रपट सादर करून तमाम प्रेक्षकांसोबत हा सण साजरा करणार आहे.

भावा-बहिणींचे अतूट असणारे नातं अनेक मराठी चित्रपटांच्या कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहेराखीच्या रेशमी धाग्याची आणि प्रेक्षकांची वीण घट्ट करून चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना मनोरंजनाची राखी बांधली आहेभावाबहिणीच्या या नात्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट गाजले आहेत आणि असेच काही सदाबहार चित्रपट झी टॉकीज 'तुला जपणार आहेचित्रपटात महोत्सवातून आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेसोमवार  ऑगस्ट रोजी सकाळी  वाजल्यापासून प्रेक्षक खारी बिस्कीटएलिझाबेथ एकादशीमाहेरची साडीआयत्या घरात घरोबा आणि भाऊ माझा पाठीराखा हे चित्रपट पाहू शकतीलतेव्हा झी टॉकिजसोबत रक्षाबंधन साजरी करण्यासाठी पाहायला विसरू नका 'तुला जपणार आहेचित्रपट महात्सव

No comments:

Post a Comment