Friday, 31 July 2020

Zee Talkies | गजर सुरक्षिततेचा

महाराष्ट्राला कीर्तनाची परंपरा खूप जुन्या काळापासून लाभलेली आहेसंतपरंपरेसोबत ही परंपरा चालत आली आहेभजन-कीर्तन म्हंटलंकी रसिकांना आठवण होतेती 'झी टॉकीज'वरील 'गजर कीर्तनाचाया कार्यक्रमाचीरसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला हा कार्यक्रमयशाच्या एका नव्या शिखरावर विराजमान झाला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून कीर्तन छोट्या पडद्यावर आलं आणि समाजप्रबोधनाच्या या प्रवासात या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक कार्तिकी गायकवाड आणि दीप्ती भागवत यांनी देखील त्यांच्या निवेदनाने योगदान दिलंलॉकडाऊनच्या काळात या कार्यक्रमाचे जुने भाग प्रेक्षकांच्या भेटीस येतो होते पण लवकरच नवीन भाग प्रेक्षकांना झी टॉकीजवर पाहायला मिळतीलया कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु झालं असूनदीप्ती भागवत हिने परळी (बीडयेथे चित्रीकरण देखील केलंप्रेक्षकांना नवीन भाग बघता यावे म्हणून या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम प्रवास करतेय पण त्याच सोबत योग्य ती खबरदारी देखील बाळगतेयसुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊन या कार्यक्रमाचं चित्रीकरण होतंय.

याबद्दल बोलताना सुत्रसंचालिका दीप्ती भागवत म्हणाली, "नुकतंच मी  दिवसाच्या शेड्युलमध्ये परळी वैजनाथ येथे गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं शूटिंग केलंसध्या शूटिंग दरम्यान खूप बदल घडले आहेतपूर्वी जितकं मोकळं वातावरण होतं आता तसं राहिलेलं नाहीयेम्हणजे अगदी मुंबई पासून परळी पर्यंत जाण्यासाठी लागणा -पासत्यासाठी मला डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागलं होतं आणि बऱ्याच फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागल्यात्यानंतर परळीला पोहोचल्यावर देखील शूटिंग करताना आम्ही बऱ्याच गोष्टींची काळजी घेतलीशूटिंग सुरु करायच्या आधी आमचं टेम्परेचर चेक केलं जातंसंपूर्ण टीम पूर्णवेळ मास्क लावून असतेआम्ही जिथे जिथे शूटिंगला जाऊ ती जागा सतत सॅनिटाईज केली जातेटेक्निकल टीम देखील संपूर्ण काळजी घेतेते ग्लव्स आणि चष्मा लावूनच काम करतातत्यामुळे शूटिंग करताना सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेतली जातेघरापासून इतक्या लांब येऊन शूटिंग करताना घरच्यांना थोडी धाकधूक होती पण हा कार्यक्रम अध्यात्मिक आहेप्रत्यक्ष परमेश्वर भक्तीशी जोडणारा आहे आणि चित्रीकरणात संपूर्ण काळजी घेतली जाते त्यामुळे हि भीती कमी झालीगजर कीर्तनाचा या कार्यक्रमातून सातत्याने सकारात्मक विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातातत्यामुळे अनेकाकांना हा कार्यक्रम बघितल्यानंतर या संकट काळात उभारी मिळतेमाझी ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे कि हे संकट लवकरात लवकर टळोपरंतु सध्याच्या काळात सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजेआपण आपली काळजी नीट घेतली तरच पर्यायाने आपण आपल्या कुटुंबाची आणि देशाची काळजी घेऊ."

No comments:

Post a Comment