१३ जुलैपासून झी युवा वाहिनीवर एंटरटेनमेंट 'फुल्ल ऑन'
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगभरात बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. खरंतर, संपूर्ण जगच या संकटामुळे थांबलं होतं. सुरळीत जीवन कधी सुरु होईल, हे आजही कुणीही सांगू शकत नाही. या अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका बसला, तो मनोरंजन विश्वाला! कोविड-१९मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात, सर्व चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचे चित्रीकरण, प्रोडक्शन आणि इतर सगळी कामे बंद करण्यात आली होती. सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करून, चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आलेले असल्यामुळे, येत्या सोमवारपासून, म्हणजेच १३ जुलैपासून 'झी युवा' वाहिनीवरील तुमच्या लाडक्या मालिकांचे नवीन भाग तुम्हाला पाहता येणार आहेत. १९ मार्चपासून स्थगित करण्यात आलेली ही सर्व कामं आता पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली आहेत. जवळपास १०० दिवसांच्या कालावधीनंतर, 'डॉक्टर डॉन', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' आणि 'प्रेम पॉयजन पंगा' या तुमच्या आवडत्या मालिकांचे नवेकोरे भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
'डॉक्टर डॉन'च्या सेटवर सर्व कलाकार आपली जबाबदारी ओळखून शूटिंग पूर्ण करत आहेत. आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास होणार नाही याची काळजी ते घेत आहेत. 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतील आपले सर्वांचे लाडके सई आणि नचिकेत, म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता निखिल दामले, यांचे सेटवरील काही विडिओ आणि फोटो आपण पाहिलेले आहेत. यावरूनच, सेटवर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे आणि योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, हे आपण पाहू शकतो. एवढेच नाही, तर सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे सेटवर काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. प्रत्येकाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी, स्पॉटदादांसह सर्वच टीमला पीपीइ किट्स देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष सीन चित्रित होत असतानाचा काळ वगळता, इतर वेळात कलाकार मास्कचा वापर करत आहेत. सेटवरील प्रत्येकाची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे, हे ओळखून प्रत्येक व्यक्ती योग्य ती खबरदारी घेत आहे. 'झी युवा' वाहिनी नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे.
Here’s when Zee Yuva will air the fresh episodes of its popular shows
Zee Yuva to roll fresh episodes of its shows from July 13
Coronavirus had put the entire world on an indefinite halt and entertainment industries took one of the worst hits due to the pandemic. The entertainment industry is among the worst hit by the COVID-19 crisis. The shootings and production processes of all films, TV shows, and web shows have been put to a halt right from March 19, 2020. Now with a few relaxations from the government in the imposed lockdown, production activities have started taking place in and around the entertainment industries. After close to 100 days, television shows recently went on floors in Mumbai with limited cast and crew. Now, another piece of good news is that fresh episodes of the popular shows of Zee Yuva will begin airing from July 13, 2020. So, the audience will once again be able to watch shows like Doctor Don, Prem Poison Panga and Almost Suphal Sampurna.
Earlier, a few actors like Nikhil Damle and Gauri Kulkarni of Almost Suphal Sampurn fame had also given glimpses of the sets that were sanitized and where all the precautionary guidelines were being followed to ensure everyone’s safety. The cast and crew of TV shows have been strictly following safety guidelines set by the government. The actors are only allowed to remove their mask during the shoot. The spot boys have been given PPE kits by the production team. With renewed energy and excitement, Zee Yuva hopes to continue to entertain the audience and reconnect them to their favourite characters.
No comments:
Post a Comment