या वैशिष्ट्यपूर्ण स्वयंमदत पुस्तकात आहे भारती सिंह,
आम्रपाली दुबे आणि अमृता खानविलकर यांच्यासह देशभरातील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या पतीला
अन्य महिलांच्या प्रभावापासून वाचविण्यासाठी दुलारीला दिलेल्या सूचनांची जंत्री!
मुंबई,
ऑक्टोबर 5, 2020 :#ZeeTVEntertainmentExpress नावाच्या ट्रेनमध्ये ऑक्टोबर महिन्यात झी टीव्हीच्या प्रेक्षकांना
ज्या चार नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत, त्यांची झलक दाखविण्यात आली होती. लॉकडाऊनचा
काळ संपत असताना प्रेक्षकांच्या मनात आनंद आणि उत्साहाच्या भावना निर्माण करण्याच्या
हेतूने ‘झी टीव्ही’ वाहिनीने संपूर्ण कुटुंबाला हसवीत ठेवील, अशी एक धमाल विनोदी मालिका
सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री
10.30 वाजता प्रसारित होणारी ‘राम प्यारे सिर्फ हमारे’ या धमाल विनोदी मालिकेत आपल्या पतीला आकर्षित करण्याचा
प्रयत्न करणार््या आपल्या गल्लीतील इतर महिलांच्या युक्त्यांपासून त्याला सुरक्षित
ठेवण्यासाठी त्याची पत्नी दुलारी जे उपाय योजते, त्याचे धमाल विनोदी चित्रण करण्यात
आले आहे.
‘राम प्यारे सिर्फ हमारे’ या
मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा राम असून तो भोपाळमध्ये
महिलांसाठी ब्युटी पार्लर चालवीत असे.तो आपल्या कामात पारंगत आणि यशस्वी असला, तरी
त्याचा सहवास मिळावा, यासाठीही अनेक महिला त्याच्या ब्युटी पार्लरला भेट देत असत.अर्थात
राम हा प्रभु रामचंद्राप्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम असून तो या महिलांच्या लाघवी आणि
लागट वर्तनाला वेळीच रोखत असतो. दुलारीला रामला अशा महिलांपासून सुरक्षित राखायचे असेत.
तिचा भाऊ पतंग याने तिला आपला नवरा सुरक्षित राखण्यासाठी कोणत्या युक्त्या अवलंबायच्या
याची माहिती देणारे एक पुस्तक दिलेले असते. दुलारी त्यातील विविध उपाय योजते आणि त्यामुळे
कधी कधी रामच अडचणीत येतो.
गेल्या काही आठवड्यांपासून दुलारीने
देशभरातील आपल्या भगिनींशी ‘रामकीदुलारी’ नावाच्या आपल्या सोशल माध्यमांवरील हॅण्डलवरून
संपर्क साधला असून आपल्या पतीला अन्य महिलांच्या आकर्षणापासून सुरक्षित कसे ठेवायचे,
याच्या सूचना मागविल्या होत्या. या मालिकेच्या वाहिनीवरून दाखविलेल्या झलकीनेही महिला
प्रेक्षकांमध्ये खूपच खळबळ उडविल्याचे लक्षात आल्यामुळे झी टीव्हीने आता या महिलांसाठी
एक स्पर्धा आयोजित केली होती. #SunBehen नावाच्या हॅण्डलवरून महिलांच्या उपजत
चातुर्यपूर्ण सूचनांचे एक पुस्तक तयार करण्यात आले. या पुस्तकात देशभरातील अनेक विवाहित
आणि अविवाहित महिलांनी आपल्या पतीला अन्य बायकांच्या आकर्षणापासून कसे सुरक्षित ठेवायचे
त्याच्या युक्त्या सांगितल्या होत्या. त्यात महिला विनोदवीर भारती सिंह, महाराष्ट्राची
शान अमृता खानविलकर आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या आम्रपाली
दुबे यासारख्या अनेक सेलिब्रिटींनीही दिलेल्या सूचनांचा समावेश आहे. या वाहिनीने या
सोशल माध्यमांच्या हॅण्डलवरून आलेल्या हजारो सूचना जमा करून त्यांचे एक पुस्तक तयार
केले असून ते या मालिकेच्या प्रीमिअरच्या दिवशी प्रकाशित करण्यात येणार आहे.
या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी
या पुस्तकात दुलारीसाठी मोठ्या प्रमाणावर सूचना पाठविल्याबद्दल मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक
सचिन मोहिते यांनी या असंख्य भगिनींचे आभार मानले आहेत. सध्या समाजातील बदलत असलेल्या
वास्तवाचे या मालिकेत कसे प्रतिबिंब पडले आहे आणि आपल्या पत्नीला समाजातील बाईलवेड्या
पुरुषांच्या नजरेपासून सुरक्षित ठेवण्याचे काम आतापर्यंत पुरुष करीत; पण आता बदलत्या
काळात आपल्या पतीवर प्रेमाचे पाश टाकणार््या महिलांपासून आपल्या पतीला कसे सुरक्षित
ठेवावे लागते, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, असे मत यावेळी अभिनेत्री ज्योती
शर्मा, निखिल खुराणा आणि शमीन मन्नन यांनी व्यक्त केले. एकंदरीतच आजच्या काळातील उदयास
येत असलेल्या नव्या मध्यमवर्गीय भारतीयांच्या जीवनातील ‘आज के किरदार, आज के किस्से’ सादर करणारी ही विनोदी मालिका आहे.
ही
मालिका आणि या पुस्तकाविषयी ‘राम प्यारे सिर्फ
हमारे’ मालिकेत दुलारीची भूमिका रंगविणारी
अभिनेत्री ज्योती शर्मा म्हणाली, “राम
प्यारे सिर्फ हमारेसारख्या धमाल विनोदी मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल
मला खूप आनंद वाटतो. खरं सांगायचं झाल्यास दुलारीची भूमिका रंगविणं हे माझ्यासाठी आव्हान
होतं कारण माझा स्वभाव या व्यक्तिरेखेपेक्षा अगदी भिन्न आहे. आपल्या नवरा दुसरी कोणती
बाई पळवून तर नेणार नाही ना, या भीतीने त्याला सुरक्षित राखण्यासाठी विविध उपाय करणं
आणि त्या उपायांमुळे उलट उदभविलेल्या अडचणीत सापडणं हा प्रकार धमाल विनोदी आहे. त्यामुळे
प्रेक्षकांची निश्चितच छान करमणूक होईल.आम्ही हे नुस्क्यांचं पुस्तक प्रसिध्द केल्याबद्दलही
मला खूप आनंद वाटतो. आमच्या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी माझ्या या
सार््या भगिनींचे आभार मानते.”
‘राम
प्यारे सिर्फ हमारे’ मालिकेत रामाची भूमिका
रंगविणारा अभिनेता निखिल खुराणा म्हणाला, “आपल्या
पत्नीशी एकनिष्ठ असलेला राम आणि त्याला आपल्यापासून हिरावून घेण्यासाठी टपलेल्या महिलांपासून
वाचविणारी त्याची पत्नी दुलारी यांची कथा असलेल्या राम प्यारे सिर्फ हमारे या मालिकेची
संकल्पना अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. विनोदाची डूब दिलेली ही नावीन्यपूर्ण कथा प्रेक्षकांना
नक्कीच आवडेल. रामची व्यक्तिरेखा मी साकारणार असून त्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत.
त्या परिसरातील अनेक महिलांना राम आकर्षक वाटतो आणि त्या त्याला आपल्याकडे ओढू इच्छितात.
झी टीव्ही वाहिनीबरोबर ही मालिका करण्याबद्दल मी अधीर झालो असून ही मालिका तसंच आमचं
हे वैशिष्ट्यपूर्ण नुस्क्यांचं पुस्तक प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, अशी मला आशा वाटते.
सध्याच्या या अवघड काळातया पुस्तकातील सूचना मनाला गुदगुल्या करून विरंगुळा देतील.”
‘राम
प्यारे सिर्फ हमारे’ मालिकेत कोएलची भूमिका
साकारणारी अभिनेत्री शमीन मन्नन म्हणाली, “पडद्यावर
विनोदाची डूब लाभलेल्या खलनायकाची भूमिका साकारणं हे नेहमीच कठीण असतं आणि माझ्यातीलअभिनेत्रीची
ती सर्वात मोठी परीक्षा असेल. त्या मोहल्ल्यातील कोएल ही सर्वात मादक आणि सौंदर्यवती
महिला आहे आणि आपल्या या सौंदर्याच्या आणि नखर््यांच्या जोरावर ती रामला आपल्या प्रेमपाशात
ओढण्याचा प्रयत्न करीत असते. आपल्या सौंदर्याचा मान राखण्यासाठी तिला तो हवा असतो.अशा
व्यक्तिरेखेला अनेक पैलू असल्याने ती विकसित करताना त्यात वेगवेगळे प्रयोग करण्यास
खूपच वाव असतो.त्यामुळेच ही व्यक्तिरेखा साकारण्यास आणि झी टीव्ही वाहिनीबरोबर काम
करण्यास मी अधीर झाले आहे.आपल्याला हवं ते कसंही करून मिळविण्याचा कोएलचा स्वभाव आहे
आणि मलाही तिचा हा स्वभाव अतिशय आवडतो.सर्वांना माझी व्यक्तिरेखा आवडेल, अशी मी आशा
करते.”
‘राम
प्यारे सिर्फ हमारे’ मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक जास्वंद एंटरटेन्मेंटस प्रायव्हेट
लिमिटेडचे सचिन मोहिते म्हणाले, “या मालिकेच्या विनोदी
बाजाइतकाच तिच्या कथानकाचा सच्चेपणा प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. या साथीच्या अवघड
काळात ही नवी मालिका प्रसारित करण्यामागे आमचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे प्रेक्षकांच्या
चेहर््यावर हास्य फुलविणं. दुलारीला वाटणारी असुरक्षितता आणि तिच्या पतीला अन्य महिलांपासून
सुरक्षित राखण्यासाठी तिने योजलेल्या विनोदी उपायांमुळे सर्वांचीच करमणूक होईल. किंबहुना
सर्वत्र आनंद पसरविण्यासाठीच आम्ही दुलारीने योजलेल्या उपायांचं एक पुस्तकही प्रकाशित
करीत असून त्यातील काही उपायांचा कदाचित काहीजणींना उपयोगही होईल.”
‘राम प्यारे सिर्फ हमारे’ मालिकेत
आपल्या पतीला इतर बायकांपासून वाचविण्यासाठी दुलारी विनोदी उपाय योजत असल्याचे पाहून
तुम्हालाही हे पुस्तक घ्यावेसे वाटत असेल ना?
आजपासून दर सोमवार ते शुक्रवारी रात्री 10.30 वाजता
पाहा ‘राम प्यारे सिर्फ हमारे’ फक्त ‘झी टीव्ही’वर!
No comments:
Post a Comment