साहित्य, चित्रपट, नाटक, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांतून विपुल लेखन करणारे ज्येष्ठ हिंदी कवी व गझलकार सूर्यभानु गुप्त यांनी वेगवेगळ्या रचनाप्रकारांतून स्वत:ला व्यक्त केले आहे. आजवर अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सूर्यभानु गुप्त यांच्या काव्य-लेखनाचा प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेत भावानुभूतीचा अनोखा अविष्कार पहायला मिळतो. अशा या प्रतिभावंताच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत त्यांच्यावर वाहिलेल्या ‘चिंतन दिशा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा माटुंग्याच्या रामनारायण रूईया महाविद्यालयात शनिवार २० एप्रिल रोजी सायंकाळी ४.०० वाजतासंपन्न होणार आहे.
या समारंभाचे अध्यक्षपद नवनीत या हिंदी मासिकाचे संपादक विश्वनाथ सचदेव भूषविणार आहेत. तर अनुभवी पत्रकार सुंदरचंद ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. विख्यात चित्रपट गीतकार जावेद अख्तर, चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी, गीतकार समीर अंजान मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी, निर्माते,पटकथा लेखक-कवी वेद राही, गुजराती कवी अनिल जोशी, मराठी कवी चंद्रशेखर सानेकर, उर्दू कथाकार सलाम बिन रज्जाक,व्यंगलेखक प्रेम जन्मेजय, संगीत दिग्दर्शक कुलदीप सिंह अशी अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. बमन मिश्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. विनोदकुमार श्रीवास्तव, हृदयेश मयंक, रमेश राजहंस, राकेश शर्मा, शैलेश सिंह हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
No comments:
Post a Comment