आपण सर्व स्वप्न पाहतो. स्वप्नं म्हणजे काय? तर, माणसाच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा- आकांक्षांचं गाठोडं. हे गाठोडं सहसा कधी रिकामी होत नाही. प्रत्येक जणस्वप्नांमागे धावत असतो. या स्वप्नांच्या आधारेच प्रत्येकजण चिवट आशा बाळगून असतो. पुष्पक विमान या चित्रपटातील तात्यांचं (मोहन जोशी) देखील असंच एकस्वप्न आहे.
पुष्पक विमानातून तुकारामांचं सदेह वैकुंठाला जाणं, या मिथकाशी तात्या एवढे एकरूप होऊन जातात, की एकदा मुंबईला आलेल्या तात्यांना विलास (सुबोध भावे) जेव्हाआकाशातून उडणारं खरंखुरं विमान दाखवतो, तेव्हा त्यांना ते विष्णुचं पुष्पक विमानच वाटतं आणि सतत त्याचंच चिंतन केल्यामुळे तुकाराम आपल्याला पुष्पकविमानात बोलावत आहेत, असे आभास त्यांना व्हायला लागतात. मग सुरू होतो तात्यांचा पुष्पक विमानात बसण्याचा अट्टाहास.
तात्यांची ही स्वप्नपूर्ती होते का? विलास त्यांना पुष्पक विमानाची सैर घडवतो का? या प्रश्नांच्या उत्तरपूर्तीसाठी तुम्हाला सिनेमाच बघायला हवा. पाहायला विसरू नका‘पुष्पक विमान’चा टेलिव्हिजन प्रीमियर ७ जुलै रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर.
No comments:
Post a Comment