फुलपाखरूच्या सेट वर भजी पार्टी
हा फोटो पाहून, हे मालिकेतलं दृश्य आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, तसं काही नाहीय. मुसळधार पावसामध्ये काही कलाकारांनी भजीपार्टीचा आनंद घेतला. झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरु’ या लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके कलाकार हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे यांनी स्वतः भजी बनवली. जोरदार पाऊस, गरमा-गरम भजी आणि कडक चहा हे कॉम्बिनेशन अफलातून आहे आणि अशा पावसाळी वातावरणात कलाकारांना देखील भजी खायचा मोह आवरला नाही. डाएट विसरून सर्व कलाकारांनी भज्यांवर ताव मारला. भर पावसात मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांची ही भजीपार्टी जोरात झाली.
No comments:
Post a Comment