Wednesday, 18 September 2019

सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा सन्मान! 'माई घाट : क्राइम नं.103/2005' सर्वोत्कृष्ट चित्रपट! - Producer Mohini Gupta and Director Ananth Narayan Mahadevan bring glory to India and Marathi cinema! MAI GHAT:CRIME NO 203/2005


एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची हेलावणारी कथा असलेल्या 'माई घाट : क्राइम नं. 103/2005' या मराठी चित्रपटाची पहिल्यांदाच 'सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात' बेस्ट चित्रपटाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविणारा पहिला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही. आठ देशातील चौदा चित्रपटांतून पहिल्या सहात निवडल्यानंतर त्यामधून 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'संकलनव 'छायाचित्रण' असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार पटकावून बाजी मारलेला आजपर्यंतचा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. महिला सबळीकरणाची कथा सांगणारा हा चित्रपट युवा निर्माती मोहिनी रामचंद्र गुप्ता त्यांच्या 'अलकेमी व्हिजन वर्क्स'ची निर्मिती असून अत्यंत वेगळ्या जातकुळीच्या अंतर्मुख करणाऱ्या सत्यघटनेवरील या चित्रपटात एका महिलेनी दिलेला विलक्षण लढात्यावर तिने मिळविलेला रोमहर्षक विजय याची गाथा काळजाला हात घालणारी असल्यानं हे निर्मितीचं शिवधनुष्य मोहिनी रामचंद्र गुप्ता या तरुणीने उचललं आहे.
'माई घाट' हा सिनेमा चार नॅशनल पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या 'मी सिंधुताई सपकाळया सिनेमाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी दिग्दर्शित केला असूनलेखन आणि संकलनही त्यांनीच केलं आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'माई घाट'नं सात विभागांमध्ये तब्बल सहा नामांकनं मिळवत 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट एडिटींग', 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी'चे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हाँग काँग अँड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल ऑथॅारीटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही 'माई घाट'च्या पाठीवर कौतुकाची थाप मारत न्याय व्यवस्थेतील ढिलाई दर्शवणाऱ्या या वास्तवदर्शी सिनेमावर स्तुती सुमनांची उधळण केली आहे. याखेरीज 'द एशियन पॅसिफीक स्क्रीन  अवॅार्डस २०१९च्या स्पर्धेसाठी या सिनेमाची अधिकृत निवड करण्यात आली होती.
सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा आईची इच्छाशक्ती दर्शवणारी आहे. माता प्रभावती अम्मा यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कायद्याच्या रक्षकांविरुद्ध दिलेला लढा या सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर आणण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधन हिनं या चित्रपटात आईची व्यक्तिरेखा सजीव केली असूनआपल्या अभिनय कौशल्यानं तिनं परीक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावला आहे. उषा जाधवसोबत या सिनेमात सुहासिनी मुळ्येकमलेश सावंतडॅा. गिरीश ओकविभावरी जोशी आणि विवेक चाबूकस्वार अशी कुशल मराठी कलाकारांची फळी आहे.
लेखनअभिनय आणि संकलन पातळीवर सशक्त असलेला 'माई घाटतांत्रिकदृष्ट्याही अतिशय सक्षम आहे. आज जिथे ४के कॅमेऱ्यानं मराठी सिनेमा शूट केला जातोतिथं सिनेमॅटोग्राफर अल्फॅान्से रॅाय यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या ६के फॅारमॅटवर 'माई घाटचित्रीत करत सिंगापूर महोत्सवातील पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवलं आहे. यातील सिक साऊंड संवादातील अर्थ अधिक स्पष्टपणे मनावर ठसवण्यात यशस्वी ठरला आहे. पूर्णिमा ओक यांचे वास्तवदर्शी कॅास्च्युम आणि रोहित कुलकर्णी यांचं ओरिजनल पार्श्वसंगीतानं 'माई घाट'ला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.
WINS BIG AT THE
-SINGAPORE SOUTH ASIAN INTERNATIONAL FILM FESTIVAL
6 NOMINATIONS OUT OF 7 CATEGORIES

BEST FILM.
BEST CINEMATOGRAPHY.
BEST EDITING
BEST DIRECTOR,

BEST SCREENPLAY,
BEST ACTRESS USHA JADHAV
WINNER
BEST FILM
BEST EDITING
BEST CINEMATOGRAPHY
AN INTERNATIONAL JURY SAW 14 FILMS IN COMPETITION FROM 8 COUNTRIES AND UNANIMOUSLY SELECTED MAI GHAT:CRIME NO 103/2005 AS THE BEST FILM AND ALSO NOMINATED IT IN 6 OUT OF THE 7 CATEGORIES FOR AWARDS.
ROGER GARCIA, FILM MAKER AND FESTIVAL AUTHORITY FROM HONG KONG AND CHINA CALLED THE FILM “AN EMOTIONALLY GRIPPING, AMBITIOUSLY RUTHLESS AND REALISTIC FILM OF DELAYED JUSTICE”
INDIAN JURY MEMBERS SUHASINI MANI RATNAM AND FILM MAKER RAJIV MENON ALSO SHOWERED PRAISE ON THE FILM.
JURY CITATION: HIGH PRAISE FOR THE FILM
ADDITIONALLY
MAI GHAT :CRIME NO 103/2005
HAS ALSO  BEEN OFFICIALLY SELECTED IN COMPETITION AT THE PRESTIGIOUS
THE ASIA PACIFIC SCREEN AWARDS 2019
BASED ON A TRUE STORY
MAI GHAT:CRIME NO 103/2005
SYNOPSIS
In the summer of 2018, for the first time in the history of the judiciary in India, two policemen were given the death sentence. It was the result of a protracted thirteen year personal war by a mother whose son was wrongly branded a thief and tortured to death in their custody. The film explores the impact of the violent act and questions our social and personal conscience, as everyone from the perpetrators of the heinous act to the victim, their families and kin are deeply impacted. The deeply flawed security system and the ominous caste barriers result in human values eroding and each character drawn into the quagmire of guilt.
 Director Quote 
When rag picker Nitin Athavale was picked up by a seething cop on charges of robbery, little did he realise that he would never be coming back home. Prabha Mai his mother lives with broken images of her son's torture in police custody and attempts to rally around her forces that would help her fight for justice in court. But despite an erudite lady lawyer picking up cudgels for her and even getting the CBI to intervene, the perpetrators of the violent act manage to cover up all loose ends as the case drags for 13 years. Along the way every character undergoes a cathartic transformation...from Nitin's friend Suresh, Suresh's mother, the policeman's wife and his daughter. The film raises a vital moral dilemma in the end...can one really win justice after everything is lost? "I am thankful to those who left me, because they taught me I can do it alone"
Ananth Narayan Mahadevan
Director
Film Mai Ghat (103/2005)
MAI GHAT: CRIME NO 103/2005
CAST:
USHA JADHAV as Prabha Mai
SUHASINI MULAY as the lawyer
KAMLESH SAWANT…as the cop
GIRISH OAK as CBI lawyer
VIBHAVARI JOSHI as Sunanda.
VIVEK CHABUKSWAR as Nitin Athavale
CREW:
Production House: ALCHEMY VISION WORKZ
Producer: MOHINI GUPTA
Director, Editor ANANTH NARAYAN MAHADEVAN
Screenplay: C P SURENDRAN-ANANTH NARAYAN MAHADEVAN
Cinematography: ALPHONSE ROY
Live Sound: BHAGAT SINGH RATHORE
Re-Recording: ANUP DEV
Production design: RAMAKANT
Costumes: PURNIMA OAK
Original background score: ROHIT KULKARNI

No comments:

Post a Comment