Friday 27 September 2019

क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून निवडक मुले जाणार क्यूपीआर अकॅडमी लंडनला

मुंबई, 25 सप्टेंबर 
    मुंबईतून दोन मुले आणि मुली अशा एकूण चार जणांची निवड लंडन येथील फुटबॉल क्लब क्विन्स पार्क रेंजर्स मध्ये सराव करण्यासाठी झाली आहे. या चार जणांची निवड डिसेंबरमध्ये झालेल्या क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून करण्यात आली.
   योहान पुनावाला (बॉम्बे इंटरनॅशनल स्कुल), सागर राठोड (कुलाबा म्युनिसिपल अपर प्रायमरी इंग्लिश), निष्का प्रकाश (एज्युब्रिज इंटरनॅशनल) आणि अदिती पांदिरे (साई बाबा पथ मुंबई पब्लिक स्कुल) या चार जणांची निवड करण्यात आली.देवरा यांनी चारही जणांना क्यूपीआर संघाची जर्सी व लंडनला जाण्यासाठी लागणारे कागदपत्र दिले. ही सर्व मुले 2 ऑक्टोबरला लंडनला रवाना होणार आहेत.
   क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर 2018 मिलिंद देवरा यांचा उपक्रम असून इंग्लिश क्लब क्विन्स पार्क रेंजर्स (क्यूपीआर) सह राबविला आहे.गेल्या दशकभरात आम्ही कुठवर येऊन पोहोचलो हे आपण पाहत आहोत. ज्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला त्यांचे मनापासून आभार. यासाठी क्यूपीआरसह आदित्य बिर्ला ग्रुप, अॅक्सिस बँक, सर्फ आणि क्रेडिट सुसी या प्रायोजकांचे आम्ही आभारी आहोत असे देवरा म्हणाले.मुलींचा उपक्रमातील सहभाग 30 टक्यापर्यंत पोहोचला आहे. क्यूपीआर अकॅडमी लंडनसाठी आता मुलींची निवड देखील होत असल्याचे देवरा यांनी पुढे सांगितले.
   या चॅम्पियनशिपमध्ये 165 शाळांमधून 6600 मुले सहभागी झाली. हजारहुन अधिक सामने खेळविण्यात आले. त्यामधील एकूण 75 टक्के सहभागी पैकी  30 टक्के सहभाग मुलींचा होता.व्यवसायिक प्रशिक्षकाकडून 60 जणांची निवड करण्यात आली. त्यामधून ही चार मुले निवडली.…......
निवड झालेल्या निवडक मुलांची माहिती;
- सागर राठोड : 13 वर्ष (मिडफिल्डर)
- ऑस्कर फाउंडेशन एसएसईकडून युरो कप, पोर्तुगाल मध्ये सहभाग
-लंडनमध्ये ऑस्कर फाउंडेशन एसएसईकडून सहभाग
- 13 वर्षाखालील आय लीग स्पर्धेत सहभाग
.......
-- निष्का प्रकाश : 14 वर्ष (सेंटर फॉरवर्ड)
- एमडीएफए महिला डिव्हिजनमध्ये सहभाग
-विफा महिला लीगमध्ये सहभाग
-एफसीबी एसकोला सोबत मुंबईत सराव
....
योहान पुनावाला : 14 वर्ष (सेंटर बॅक)
- मुंबई जिल्हा 14 वर्षाखालील संघाकडून सहभाग
- एमडीएफए 14 वर्षाखालील संघाकडून सहभाग
…......
आदिती पांदिरे : 13 वर्ष (मिडफिल्डर)
-डीएसओ 14 वर्षाखालील संघाकडून सहभाग
-बिवीबी एवोनिक कॅम्पमध्ये सहभाग

No comments:

Post a Comment