'झी युवा'वर सुरूच राहणार मनोरंजनाचा डोस!!!
प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी, 'झी युवा' वाहिनी नेहमीच तत्पर असते. विविध मालिका, कथाबाह्य कार्यक्रम यांची रेलचेल वाहिनीवर पाहायला मिळते. म्हणूनच, 'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी वाहिनी आहे. 'झी युवा'कडून प्रेक्षकांचे मनोरंजन अखंडितपणे सुरु आहे.
आज संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा या संकटाचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी, घरी राहणे अत्यावश्यक आहे. अर्थातच, मराठी मनोरंजन सृष्टी सुद्धा यापासून दूर नाही. कोरोनाशी लढा दयायचा, तर घरात थांबणे अनिवार्य असल्यामुळे, सर्वच मालिकांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. 'सोशल डिस्टंसिंग' पाळण्यात येत आहे. अशावेळी, प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये, याची पुरेपूर काळजी 'झी युवा' वाहिनी घेणार आहे. नव्या भागांचे चित्रीकरण होत नसल्याने, वाहिनीवरील सर्व मालिका पहिल्या भागापासून पुन्हा दाखवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला असल्याचे समजते आहे. 'डॉक्टर डॉन', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' आणि 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकांच्या चाहत्यांसाठी ही एक खुशखबर ठरली आहे. यानिमित्ताने मालिकेचे उत्तम भाग पुन्हा पाहण्याची संधी अनेकांना मिळेल, तर ज्यांनी मालिकेची सुरुवात चुकवली आहे, त्यांना ती पाहण्याची संधी सुद्धा उपलब्ध झालेली आहे. एवढेच नाही, तर त्याच त्याच प्रकारातील मालिका, सासूसुनांची, नवराबायकोची भांडणे पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. 'झी युवा' वाहिनीवर, हटके आणि वेगळ्या मालिका पाहता येणार आहेत. रोजच्या मालिकांहून निराळ्या, आणि भरपूर मनोरंजन करणाऱ्या या मालिका प्रेक्षकांनी अवश्य पाहायला हव्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये. घरात बसून, 'झी युवा' वाहिनीवरील उत्कृष्ट मालिकांचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा प्रेक्षकांनी दवडता कामा नये.
No comments:
Post a Comment