Friday, 13 March 2020

मराठमोळ्या प्राजक्ता शिंदेचा बोल्ड अंदाज

नाटक, सिनेमाच्या आकर्षणातून अनेकजण चंदेरी दुनियेत येऊ इच्छितात. पण प्रत्येकालाच मिळालेल्या संधीचे सोनं करता येतच असं नाही. अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पहात आहे. २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'इमेल फिमेल चित्रपटात प्राजक्ता अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एस.एम.बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणालीमी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे. हल्ली सोशल मिडीयाचे व्यसनच जणू सगळ्यांना लागल्याचं चित्र आहे. चुकीच्या मार्गाने एखाद्याला जाळ्यात ओढलंही जाऊ शकतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. प्राजक्ताला बोल्डग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्राजक्ता सोबत 'इमेल फिमेल चित्रपटात निखिल रत्नपारखी,विक्रम गोखलेविजय पाटकरदिप्ती भागवतकांचन पगारेसुनील गोडबोलेकमलेश सावंतप्रतीक्षा जाधवश्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment