Monday, 10 August 2020

Zee Talkies | सकारात्मक राहिलं पाहिजे - मृणाल कुलकर्णी

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं२०१९मध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिकाजिजाऊ आऊसाहेबांचं युद्ध नैपुण्य आणि राजकारणातल कौशल्य दाखवण्याची संधी मृणाल यांना फत्तेशिकस्तच्या माध्यमातुन मिळालीहा लोकप्रिय चित्रपट १६ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच प्रेक्षकांना झी टॉकीज या वाहिनीवर पाहायला मिळेलसध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत असताना मृणाल शिवाजी महाराजांच्या धैर्य आणि संयमाने शत्रूवर विजय मिळवण्याच्या शिकवणीला लक्षात ठेवून म्हणाल्या, "फक्त शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर महाराजांचं चरित्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्यातल्या अनेक गोष्टी आपण अंगी बाळगायला शिकलं पाहिजेकोरोनाच्या संकटातसुद्धा आपण महाराजांसारखं सकारात्मक राहून या संकटातुन आपली सुटका करून घेतली पाहिजे."

No comments:

Post a Comment