अप्पांची लॉकडाउन युक्ति ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण!
मनोरंजन क्षेत्राला कोरोना लोकडाउन च्या काळात अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. अतिशय बिकट अटी सांभाळत वाहिन्या आणि निर्मिति संस्थानी शूटिंगला सुरुवात केली. मात्र कलाकारांसाठी कोरोनाच्या या भीतियुक्त वातावरणात काम करणे खरच जोखमीचे होते. त्याचबरोबर रोजचा प्रवास करणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे . त्यात सरकारी नियमांप्रमाणे ६५ वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना सेटवर येण्यास मनाई होती. मात्र ६४ वय असलेल्या अप्पा केतकरांना म्हणजेच ज्येष्ठ अभिनेता सुनील गोडबोलेंना हा नियम लागु नव्हता. पण कितीही झाल तरी कोरोना पासून जेष्ठ नागरिकांनी स्वतः ची काळजी घेण महत्वाचे होते. स्वतःच्या आरोग्याचे कारण देत अप्पांनी काम बंद केले असते तर प्रेक्षकांची निराशा झाली असते कारण अप्पांची मालिकेमधील व्यक्तिरेखा खुप महत्वाची आहे. त्यामुळे झी युवा वरील ’ऑलमोस्ट सुफल सम्पूर्ण’चे आवडते अप्पा सुनील गोडबोले (वय वर्ष ६४) यांनी यावर एक नामी युक्ति योजली.
आप्पांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी एक मोठा निर्णय घेतला. आपल्या प्रेक्षक कुटुंबासाठी शूटिंग सुरु झाल्या दिवसापासून अप्पा स्वतःच्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहत आहे. त्यांनी झी युवा वाहिनी शी बोलून शूटिंगच्या बंगल्या मध्येच स्वःताची राहण्याची व्यवस्था करून घेतली. झी युवा वाहिनी आणि सोहम प्रोडक्शनने सुद्धा त्यांना आराम मिळेल अशी व्यवस्था करुन दिली. आज गेले ५० दिवस अप्पा असे राहत आहेत आणि त्यांनी योजेलेल्या युक्ति मुळे त्यांचे आरोग्य आणि शूटिंग ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण झाले.
No comments:
Post a Comment