Tuesday 18 August 2020

Zee Yuva - Almost Suphal Sampurna

 ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण...गणेश चतुर्थी विशेष

अप्पा करणार २१ गणपतींचं दर्शन?

झी युवावरच्या ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण या मालिकेमध्ये यावर्षी नचिकेतच्या घरामध्येही गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणारेनचिकेत त्यानुसार आवश्यक ती सर्व तयारी करण्यात मग्न झालाययात अर्थातच त्याला सईचीही साथ असणारे.

सई नचिकेतला पूजाअर्चा समजवण्यासाठी त्याच्या घरी जायला तयार होते आणि नेहमीप्रमाणे तिच्या घरात काहीतरी निमित्त सांगून नचिकेतकडे जायला बाहेर पडतेसर्व काही सुरळीत सुरु असतानाच यात एक वेगळे वळण येणारेदरवर्षी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी एकवीस गणपतीचे दर्शन घेण्याचा अप्पांचा नियम आहे त्यानूसार ते वीस गणपतीचे दर्शन घेतात पण एकविसावा गणपती दर्शनासाठी जाताना त्यांचा पाय मुरगळतो आणि त्यांना घरी यावं लागतंआता दरवर्षीचा हा नियम मोडू नये यासाठी अप्पांकडे एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे नचिकेतच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणे.

अप्पा हा पर्याय घेऊन आपला दरवर्षीचा नियम पूर्ण करणार कायासाठी पहात रहा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण फक्त झी युवा वर.

No comments:

Post a Comment