Tuesday 18 August 2020

Zee Yuva - Prem Poison Panga

प्रेम पॉयजन पंगा... गणेश चतुर्थी विशेष

जुई स्वतःच्या हातांनी बनवणार बाप्पाची मूर्ती

श्रावण महिना संपत आलाय आणि भाद्रपद महिना अगदी समोर येऊन ठेपलायसर्वांना वेध लागलेत ते गणेश चतुर्थीचेझी युवाच्या प्रेम पॉयजन पंगा मालिकेमध्येही देसाईंच्या घरामध्ये गणेश आगमनाची तयारी सुरु झालीये पण तुफान पाऊस सुरु असल्यामुळे घरात गणेशाची मुर्ती येण्यासाठी वेळ लागतोयअशावेळी योग्य मुहुर्तावर गणेशाची प्रतिष्ठापना करता यावी यासाठी जुई एक शक्कल लढवते ती घरातच गणपतीची सुबक मुर्ती बनवते ती ही ओल्या मातीची आणि या इकोफ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना देसाईंच्या घरात यावर्षी केली जाणारेइको फ्रेंडली असल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनानंतर या मातीत रोपही लावले जाणारे हे विशेष.

एकुणच देसाईंच्या घरातला यावर्षीचा बाप्पाचा सोहळा हा इकोफ्रेंडली आणि अत्यंत साध्या पद्धतीने पार पडणारेतेव्हा पहायला विसरु नका प्रेम पॉयजन पंगा मालिकेचे गणेश चतुर्थी विशेष भाग फक्त झी युवावर

No comments:

Post a Comment