सुसंस्कृत नेता अशी ओळख लाभलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. स्वच्छ प्रतिमा आणि उत्तम प्रशासन कौशल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटविला. अभ्यासू वृत्तीने व प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाने लोकहिताचे अनेक चांगले निर्णय घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणापलीकडे जात जनतेत आपली स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय वाटचाल जाणून घेत सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दृष्टीकोन, येत्या निवडणुकीविषयी तसेच त्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा या सगळ्यांविषयी जाणून घेण्याची संधी भाडिपाच्या ‘लोकमंच’ वर मिळणार आहे. मंगळवार ९ एप्रिलला मराठी साहित्य संघ, गिरगांव, येथे सायंकाळी ६.०० वा. हा संवाद रंगणार आहे. अभिनेता सारंग साठ्ये यांच्यासोबत हा संवाद रंगणार आहे.
‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचे विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण विचार या संवादाच्या निमित्ताने जाणून घेता येणार आहेत.

No comments:
Post a Comment