एम.एफ. हुस्सेन यांचे चाहते, चित्रपट निर्माते ब्रँड गुरु स्वरूव श्रीवास्तव यांना भावली विश्वशांती देणारी पेंटिंग्ज!
एम.एफ. हुस्सेन यांच्या कलाकृतींवर जिवापाड प्रेम करणारे आणि ‘श्वास’ या ऑस्करपर्यंत धडकलेल्या मराठी चित्रपटासोबतच सुपरहिट ‘क्रिश’ चित्रपटाला आर्थिक पुरवठा करणारे चित्रपट निर्माते ब्रँड गुरु स्वरूव श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत एलिमेंट्स कला प्रदर्शना’ची सांगता करण्यात आली. आपली उपजत कला स्वतःचा गृहसंसार सांभाळून हॉबी म्हणून जोपासणाऱ्या कलावंत कांचन महंते, पूजा आनंद, निमिषा भन्साळी, स्वाती राखोंडे, विशाखा ठक्कर या गृहिणींच्या कलाकृतींचे 'गृप पेंटिंग्ज कला प्रदर्शन' नेहरू सेंटर येथील कलादालनात भरवण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजक गुरु स्वरूप श्रीवास्तव यांची उपस्थिती हे एक प्रमुख आकर्षण या प्रदर्शनासाठी विशेष होते. गेली पंचवीसहून अधिक वर्षे विज्ञानधिष्टीत वेगवेगळ्या पेंटींगची खरेदी करणारे ते सर्वात मोठे रसिक असून, भारतीय कलाक्षेत्रात त्यांची विशेष ओळख आहे. भारतीय कलावंतांच्या पेंटींगची सर्वाधिक विक्रमी किंमतींत खरेदी करणारे ते एकमेव रसिक आहेत. आपला घरसंसार सांभाळून सुंदर कलाविष्काराद्वारे विश्वशांतीचा संदेश देणारी आकर्षक पेंटिंग्ज पाहून ह्या पाचही कलावंतांमध्ये दैवी कलागुण असल्याचे उद्गार ब्रँड गुरु स्वरूव श्रीवास्तव यांनी याप्रसंगी काढले.
दिनांक ९ ते १५ एप्रिल दरम्यान नेहरू सेंटर, वरळी येथे संपन्न झालेल्या या प्रदर्शन सोहळयाला कलारसिकांनी सुरुवातीपासूनच विशेष गर्दी करून उदंड प्रतिसाद दिला होता. ‘स्वरूप उद्योग समूहा’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कला प्रदर्शनातून जगासमोर पाच महिला कलावंतांनी तयार केलेल्या पेंटींग्जद्वारे ‘विश्वशांतीचा’ संदेश देण्यात आला होता. गुरुजींनी आम्हा नवोदित कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी मदत करून हे प्रदर्शन संस्मरणीय केले. तसेच या प्रदर्शनाच्या ‘सांगता सोहळ्या’साठी उपस्थित राहून आमचा हुरूप वाढवला आहे. त्यांनी भारतातील कलावंतांच्या पेंटिंग्जची सर्वाधिक विक्रमी रक्कमेत, कॉर्पोरेट पद्दतीने खरेदी करून ‘भारतीय कलेची’ आणि कलावंतांची खरी पारख करणारे ते जोहरी ठरले आहेत असे उदगार या महिला कलावंतांनी काढले. गुरु स्वरूव श्रीवास्तव हे विज्ञानतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, उद्योजक व जाणकार कलातज्ञ असल्याने त्यांची प्रतिक्रिया या पाचही कलावंतांसाठी विशेष होती.
गुरु स्वरूप श्रीवास्तव हे आयआयटी(दिल्ली), चे गोल्ड मेडलिस्ट असून ते वेगवेगळ्या दुर्मिळ पेंटिंगचे जतन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गुरु स्वरूप श्रीवास्तव यांची कलातज्ञ, विज्ञानधिष्ठ उद्योगपती, अर्थतज्ञ, समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. त्यांना रोटरी क्लब, तसेच बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्ली सरकारच्या वतीने ‘राष्ट्रीय रत्न’ तसेच ‘उद्योग रत्न शिरोमणी’, अश्या लाईफ टाइम अचिव्हमेंट अॅवार्डने गौरवण्यात आले आहे. त्यांचे नाव कलाक्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये लिहिले गेले आहे. अशी अष्टपैलू व्यक्ती आम्हा सामान्य गृहिणींच्या कला प्रदर्शनाच्या सांगता समारंभाला 'विशेष अतिथी' म्हणून लाभणं ही गोष्ट आमच्यासाठी विशेष बाब असून, प्रदर्शनानंतरही या गोड आठवणी आम्हाला प्रेरणा देत राहतील असे कांचन महंते यांनी सांगितले.
गुरु स्वरूप श्रीवास्तव म्हणाले, जगभरातील कलाप्रकारांमध्ये भारतीय कला सर्वाधिक प्रगत असून आपल्या कलावंतांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. मी भारतीय कलाप्रकारांवर निस्सीम प्रेम करतो. भारतीय जगविख्यात कलावंत एम. एफ. हुस्सेन यांच्या दुर्मिळ पेंटिंगचा मी भोक्ता असून, त्यांच्या पेंटिंग्जची सर्वाधिक रोख रक्कमेत खरेदी करून मी जरी इतिहास रचला असला, तरी इतरांनीही असेच कलावंतांच्या पाठीशी उभे राहावे, त्यांच्या नव्या कल्पनांना भराऱ्या घेण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवावे. या प्रदर्शनात सहभागी महिला कलावंत उपजत कलागुण घेऊन आल्या आहेत. त्यांच्या कल्पकतेला तोड नाही. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या सुंदर कलाकृतींची निर्मिती करून त्यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले आहे. या कलावंतांनी अपार मेहनतीने या कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यांच्या कलाकृती जगातील प्रतिष्टीत दालनात पहायला मला आवडतील. आपलं घर- संसार सांभाळून ही कला जोपासणं सोप्प काम नाही. पुढे बोलताना गुरु स्वरूप श्रीवास्तव म्हणाले कि हुस्सेन साहेबांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे रंग. ते विलक्षण रंग वापरत. त्यामुळे त्यांची पेंटिंग आकर्षकतेसोबतच आक्रमक असत, त्यामुळे ती वादग्रस्त होत. पण ‘बुद्धा आर्ट’मध्ये शांतीप्रिय रंगसंगती पहायला मिळते, तिचा तो आत्मा आहे. आपला भारतदेश शांतीप्रिय आहे. ‘बुद्धा आर्ट’च्या माध्यमातून या पाचही प्रतिभावंतांनी अप्रतिम कलाविष्कार घडवला आहे.
No comments:
Post a Comment