भावपूर्ण
संगीत मनाला शांत करू शकते तसेच शब्द अतिशय सुंदररीत्या व्यक्त करू शकते आणि
कलर्सच्या आगामी महान कलाकृती राम सिया के लव कुश हा शो त्याच्या ट्रॅक मधून सिध्द
करणार आहे. महान रामायण लव आणि कुश यांच्या नजरेतून या शो मध्ये निवेदित केले
जाणार आहे. रामायण या हिंदू ग्रंथातील या प्रस्तुतीकरणात राम आणि सीता केंद्रभागी
असणार आहेत आणि विश्वास, प्रेम, पराक्रम, बंधुभाव आणि त्याग या भावना त्यात साकारल्या
जाणार आहेत.
रामायणाचे
हे प्रस्तुतीकरण निर्माण करण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकारांनी
सहयोग केला आहे, महत्वाच्या घटकांपैकी एक असलेल्या संगीताकडे जास्त लक्ष देण्यात
आले आहे. इंडी-पॉप गाण्यांसाठी प्रसिध्द असलेले,संगीत आणि सिध्दार्थ हळदीपूर यांनी
राम सिया के लव कुश या शोच्या शीर्षक गीताची रचना केली आहे.
या
वैशिष्ट्यपूर्ण गाण्याला जिवंत केले आहे विख्यात गायक उदित नारायण यांनी,
त्यांच्या मधुर आवाजात. ही जोडी नामवंत संगीत रचनाकार अमर हळदीपूर यांचे भाऊ आहेत.
आम्ही असे ऐकले आहे की ही जोडी प्रथमच एखाद्या पौराणिक कथेसाठी रचना करत आहेत.
या
सहभागाविषयी बोलताना, संगीत आणि सिध्दार्थ हळदीपूर म्हणाले, “राम सिया के लव कुश सारख्या महान शो मध्ये
सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. एखाद्या पौराणिक शो साठी आम्ही प्रथमच काम
करत आहोत आणि त्यात आम्हाला खूप छान अनुभव मिळाला. आम्हाला उदित नारायण आमच्या
गाण्यासाठी मिळाले हे आमचे नशीबच आहे, त्यांनी त्यांच्या भावपूर्ण आवाजाने आमच्या
गाण्याला जिवंत केले आहे. आमचा सिध्दार्थ कुमार तिवारी यांच्याशी यशस्वी सहयोग
झाला आहे, ते आमच्याकडे आले व त्यांनी आम्हाला शोची कथा ऐकवली तेव्हा नाकारण्याचे
काही कारणच नव्हते म्हणून आम्ही लगेच हो म्हटले. आम्हाला खात्री आहे की
प्रेक्षकांना सुध्दा हे गाणे नक्की आवडेल.”
राम सिया के लव कुश सुरू होणार आहे कलर्स वर 5 ऑगस्ट 2019
रोजी.

No comments:
Post a Comment