पावसाळी ऋतू जरी सुरु झाला असला तरी महाराष्ट्रातील काही भागात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतं.पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे. पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट महिलांना करावी लागते. पाण्याने भरलेले हांडे आणि कळश्या घेऊन महिलांना अपार कष्टघेऊन ते पाणी घरी न्यावे लागते. अशा वेळेस महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या झी मराठीने छोटासा मदतीचा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेडजिल्ह्यातील लोहा या गावात झी मराठीकडून जनतेसाठी वॉटर वॉकर यांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये १५ लिटर पाणी भरून त्याला सरकवत पुढे नेता येतं जेणेकरूनमहिलांना डोक्यावर हंडे आणि कळश्यांचं ओझं घेऊन जावं लागणार नाही. सरपंच चौत्राबाई सुभान जाधव आणि उपसरपंच रणजीत पाटील घोरबंद यांच्या हस्ते वॉटरवॉकरचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment