मुंबई १८ जुलै, २०१९ : श्री लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये समुद्रमंथनास सुरुवात झाली आहे... समुद्रमंथन विष्णु आणि लक्ष्मीच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे... ज्या कारणासाठी समुद्रमंथनाचे प्रयोजन करण्यात आले ते रत्न म्हणजे लक्ष्मी अखेर समुद्र्लोक सोडून भूलोकावर पहिले पाऊल टाकणार आहे... विष्णू आणि लक्ष्मी यांची भेट व्हावी आणि त्यांचा विवाह संपन्न होण्यासाठी समुद्रमंथनाचे प्रयोजन करण्यात आले...लक्ष्मीच्या जन्मापासूनच तिच्यावर कोणाचीही दृष्टी पडू नये असे बंधन समुद्र देवावर होते..अखेर लक्ष्मीची भूलोकावर येण्याची वेळ जवळ आली आहे... हा विशेष भाग प्रेक्षकांना २२ जुलैला बघायला मिळणार आहे. समुद्रमंथनामधून कल्पवृक्ष, इंद्राचे वाहन ऐरावत आणि अनेक रत्ने बाहेर आली...लक्ष्मीच्या भूलोकावर येण्याने कोणाला त्याचा लाभ होणार? लक्ष्मीला तिचं खर रूप कळणार का? लक्ष्मी आणि विष्णूची भेट कशी होणार? त्यांच्या विवाहाचा योग कसा जुळला जाणार ?
हे सगळ जाणून घेण्यासाठी बघत रहा श्री लक्ष्मीनारायण सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment