Friday 6 March 2020

गिरीश ओक आणि सुशांत शेलार बाप लेकाच्या भूमिकेत

एकानंतर एक दमदार चित्रपट, मालिकांमधून जेष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो. गिरीश ओक यांचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी टॉकीजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे नाव आहे ‘गोल गोल गरा गरा’. या चित्रपटात गिरीश ओकसह अभिनेता सुशांत शेलार दिसणार आहे. यापूर्वी ही या दोघांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे गोल गोल गरा गरा या चित्रपटातून पुन्हा एकदा ही जोडी बाप आणि लेकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येईल. हा चित्रपट रविवार १५ मार्च रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गिरीश ओक आणि सुशांत शेलार यांची ऑनस्क्रीन बाप-लेकाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment