Tuesday 3 March 2020

अपूर्वाच्या लुकवर नेटकरी फिदा

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले ’ या मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला अक्षरशः खिळवून ठेवलं आहेअल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलंया मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेतपण रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंताशेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलंशेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे.
शेवंताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला तिच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहेअपूर्वा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय आहेनुकतंच एका कार्यक्रमाला गेलेल्या अपूर्वाने तिने परिधान केलेल्या साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केलेपीच कलरच्या साडीमध्ये अपूर्वा खूपच लाजवाब दिसतेयतिच्या या लुकवर देखील चाहते फिदा झाले आहेततिच्या या फोटोजवर प्रेक्षक आणि चाहते कॉमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेतशेवंता जितकी मालिकेत मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यातदेखील ती मादक आहेशेवंताची व्यतिरेखा साकारल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment