Thursday 5 March 2020

Voot Select – थोर कहाण्यांचे नवे दालन आता Voot वर लाइव्ह!



~  नेटवर्कचे उत्तमोत्तम कार्यक्रम पहा टीव्हीच्या २४ तास आधी ~
~ स्ट्रीमिंग सर्विस - ३५+ लाईव्ह चॅनेल्स, ३० हून अधिक आगामी ओरीजिनल्स, + आंतरराष्ट्रीय स्टुडिओ पार्टनरशीप्स,  १५००+ चित्रपट आणि बरेच काही ~
~  ही सेवा मासिक रु. ९९ किंवा रु. ४९९ वार्षिक वर्गणीच्या खास ऑफरसह  रु. ९९९ च्या वार्षिक वर्गणीमध्ये उपलब्ध ~
~ असुर आणि मर्जी या सायकोलॉजीकल थ्रिलर आणि थरारनाट्यांच्या प्रीमियरच्या साथीने  VOOT सिलेक्ट आजपासून लाईव्ह होणार ~
मुंबई, मार्च २०२०: मनोवेधक कन्टेन्ट,  कथा-कार्यक्रमांचे वेगवेगळे प्रकार, ताजा आणि धगधगीत दृष्टिकोन - आपल्या वैविध्यपूर्ण कन्टेन्टच्या बळावर Voot ने भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल मनोरंजन मंचांच्या यादीत दुस-या क्रमांकावर मुसंडी मारली आहे. आणि आता आपली नवीन सबस्क्रिप्शनवर आधारित स्ट्रीमिंग सेवा Voot Select च्या रुपाने या प्रवासातील एक नवा अध्याय सुरू करत Voot आपल्या प्रेक्षकांना मनोरंजनाचा एक अधिकच खास अनुभव देणार आहे.
थरार, नाट्य आणि अॅक्शन अशा सर्व प्रकारांतील ताकदीची कथानके आणि प्रेक्षकांना समरस व्हायला भाग पडेल असा ऐवज घेऊन येणारे, गोष्टी ऐकविण्यासाठीच तयार झालेले Voot Select मार्च २०२० पासून लाईव्ह होणार आहे. Voot Select चा अनुभव घेण्यासाठी Voot अॅप डाऊनलोड करा. अॅण्ड्रॉइड, iOS आणि वेब यूजर्ससाठी उपलब्ध असलेली ही नवीन प्रीमियम सेवा ९९ रुपयांच्या मासिक वर्गणीमध्ये किंवा ९९९ रुपयांच्या वार्षिक वर्गणीमध्ये उपलब्ध असणार आहे. वार्षिक सदस्यत्वासाठी ४९९ रुपयांच्या स्वागत मूल्याची ऑफर सुद्धा जाहीर करण्यात आली होती.
Voot Selectच्या सबस्क्रायबर्सना कलर्स, एमटीव्ही व इतर स्थानिक भाषांतील चॅनल्सवरील उत्तमोत्तम कार्यक्रम २४ तास आधीच पाहता येतील तर माहितीपर कार्यक्रम टीव्हीच्या अर्धा तास आधी पाहता येतील. जगभरातील अतिशय गाजलेले कार्यक्रम, ग्लोबल प्रिमियर्स, थेट प्रक्षेपणे, खास दैनंदिन कार्यक्रम, फॅशन, क्रिडा आणि लाइफस्टाइलवर आधारित कार्यक्रम अशा सा-या आंतरराष्ट्रीय कन्टेन्टची यादीच उपलब्ध असेल. ४८ अवर्स, क्राइम्स ऑफ द सेंच्युरी, व्हिसरब्लोअर, एनिमीज FBI Vs प्रेसिडंट यांसारख्या वर्मी बोट ठेवणा-या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या डॉक्युमेंट्रीज / डॉक्यु सीरिज; व्हाय विमेन किल, ट्वायलाइट झोन, बेव्हर्ली हिल्स ९०२१०, नॅन्सी ड्र्यू यांसारख्या नवनव्या कार्यक्रमांचे खास ग्लोबल प्रिमीअर्स, डेक्स्टर कॅलिफोर्निकेशन, एलिमेंटरी, मॅडम सेक्रेटरी, नर्स जॅकी यांसारख्या समीक्षकांनी गौरविलेल्या मालिका हे सारे काही प्रेक्षकांना नाट्य आणि मनोरंजनाचा नियमित पुरवठा करत राहील. प्रेक्षकांचा दर्जेदार रिअॅलिटी शोजचा शोधही Voot Select पाशी येऊन थांबणार आहे. कारण इथे त्यांना मास्टरशेफ यूएसए, मास्टर शेफ ज्युनियर, शार्क टँक, अमेरिकाज गॉट टॅलेन्‍ट, ब्रिटन्स गॉट टॅलेन्ट, अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल, एक्स फॅक्टर, प्रोजेक्ट रनवे, फिअर फॅक्टर, माय किचन रुल्स आणि असे कितीतरी रिअॅलिटी कार्यक्रम पहायला मिळणार आहेत. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांबरोबरच Voot Select च्या कंटेन्ट लायब्ररीमध्ये मार्था स्ट्यूअर्ट, जेमी ऑलिव्हर, नायजेला लॉसन आणि दिवंगत अँथनी बोर्डेन यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या तारांकित शेफ्सच्या पुरस्कार विजेत्या पाककलेवरील मालिकांचाही चांगला संग्रह आहे.
बहुभाषिक कार्यक्रमांचा सर्वोत्तम संग्रह, ३०+ ओरिजिनल्स, १५००+ चित्रपट असा मोठाच संग्रह जवळ बाळगणारे VOOT Select दर महिन्याला एक नवीन सिलेक्ट ओरिजिनल अशा प्रकारे आपल्या वैविध्यपूर्ण ओरिजिनल मालिकांची मेजवानी प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांना आकर्षित करत राहील. काही अत्यंत सर्जनशील आणि अनोख्या प्रतिभेचे धनी असलेल्या अभिनेते, दिग्दर्शक आणि कथाकारांनी जिवंत केलेल्या ताकदीच्या कहाण्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतील, त्यांना आपल्या विश्वात सामील करून घेतील व त्यांच्या मनांचा ताबा घेतील. Voot Select च्या लाचिंग सोहळ्यामध्ये साकेब सलीम, अपूर्वा लाखिया, विक्रम भट्ट, राजीव खंडेलवाल, अहाना कुमरा, बरुन सोबती, रिद्धी डोगरा, नेहा शर्मा, नील भूपालन, पियुष मिश्रा यांच्यासारख्या सुप्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. एका सीरियल किलरच्या मनाचा थांग शोधू पाहणा-या, लैंगिक ओळखींनी घालून दिलेल्या चौकटींना प्रश्न विचारणा-या, कुटुंब या शब्दाच्या व्याख्येत खराखुरा अर्थ भरणा-या, देशातील न्यायप्रदानाच्या प्रक्रियेवर वाद घडवून आणणा-या आणि अर्थातच भारताचे मनोरंजन करत राहणा-या आपल्या कार्यक्रमांची घोषणा करण्यासाठी ही मंडळी या मंचावर उपस्थित होती.
यापैकी 'असुर' या मालिकेमधून अभिनेता अर्शद वारसी डिजिटल पडद्यावर पदार्पण करत आहे. ही मालिका म्हणजे एक अनोखी मनोवैज्ञानिक थरारकथा आहे, जी प्रेक्षकांना परस्परांपासून अगदी भिन्न अशा दोन जगांची सफर घडवून आणते. यातील एक जग आहे न्यायवैद्यकशास्त्राचे अर्थात फोरेन्सिक सायन्सचे तर दुसरे जग आहे भारतीय मिथकांमध्ये दडलेल्या गूढांचे. दुस-या बाजूला राजीव खंडेलवाल आणि आहना कुमरा यांच्या भूमिका असलेल्या 'मर्जी' या नाट्यमय थरारकथेमध्ये एका अन्यायग्रस्त स्त्रीची कहाणी चितारण्यात आली आहे. तिच्या नजरेत आरोपी असलेल्या व्यक्तीला गुन्हेगार सिद्ध करण्याचे आव्हान तिच्यासमोर आहे. 'द रायकर केस' ही एका कुटुंबात घडणारी नाट्यमय आणि थरारक कथा आहे. प्रेम, धोका आणि एकमेकांपासून दडवून ठेवलेली गुपिते यांच्यामुळे या कुटुंब कसे विस्कटत जाते याची कहाणी या मालिकेत मांडण्यात आली आहे. 'इल्लिगल' या एक न्यायप्रक्रियेवर सखोल भाष्य करणा-या मालिकेमध्ये माणुसकीवरील विश्वास जिवंत रहावा ही आस घेऊन जिंकल्या गेलेल्या खटल्यांच्या कथा सांगितल्या गेल्या आहेत. याशिवाय क्रॅकडाऊन नावाच्या अॅक्शन ड्रामामधून साकेब सालेम आणि श्रिया पिळगांवकर हे बॉलिवूडमधील तारेही Voot च्या कुटुंबात सामील होणार आहेत. अपूर्व लाखिया दिग्दर्शित आणि निर्मित नाट्यमयतेने शिगोशिग भरलेली क्रॅकडाऊन मालिका अजूनही निर्मितीप्रक्रियेमध्ये आहे. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या एका संभाव्य धोक्याचे रहस्य उलगडण्यासाठी चाललेल्या धडपडीची ही एक अनेक अनपेक्षित वळणांनी पुढे जाणारी, क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारी गोष्ट असणार आहे. याखेरीज Voot Select वर कन्या कुमारी हा कॉमेडी ड्रामा आणि शॉक अहलाद ही रोमँटिक कॉमेडी अशी दोन बंगाली ओरिजिनल्स तसेच डोन्ट थिंक ही अॅक्शन थ्रिलर, सिराई नावाची सायकोलॉजीकल थ्रिलर आणि १८ प्लस ही अॅडल्ट कॉमेडी अशा तीन तामिळ ओरिजिनल्स पाहता येणार आहेत. स्थानिक भाषांतील आपल्या ओरिजिनल्सच्या साथीने Voot Select वर डब केलेल्या विविध भाषांतील मालिकाही दिसणार आहेत.
Voot Select च्या अनोख्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना फरझाद पालिया, हेड – Voot Select, युवा, संगीत आणि इंग्रजी मनोरंजन, Viacom18 म्हणाले, “Voot Select ची  जडणघडण आणि मांडणी आजच्या 'ऑन-डिमांड' पिढीचा कल लक्षात घेऊनच अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे. भारताला मनोरंजनाचे असे अनोखे ठिकाण उपलब्ध करून देत असल्याचा आम्हाला आनंद आहे. हिंदी आणि स्थानिक भाषांतील ओरिजिनल्स, जगभरातील लाइव्ह टेलिव्हिजन चॅनल्स, जगभरात सर्वाधिक प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचून घेणा-या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा सर्वात मोठा संग्रह इथपासून ते आमच्या टीव्ही नेटवर्कवरील कार्यक्रम २४ तास आधीच पाहण्याची संधी अशा सर्व सोयी देऊ करणारा हा मंच ख-या अर्थाने असाधारण आहे. जाहिरातींपासून मुक्तता, मल्टि स्क्रीन अॅक्सेसला मुभा आणि अत्यंत कार्यक्षमतेने काम करणारे रेकमेंडेशन इंजिन यांच्यामुळे तर आमच्या सबस्कायबर्सच्या मनोरंजनात्मक अनुभवामध्ये आणखी मोलाची भर पडणार आहे.''
आपल्या मालिकेविषयी बोलताना अर्शद वारसी म्हणाला, ''असुरमधून मी डिजिटल पडद्यावर पदार्पण करत आहे. आपल्या नव्या कामाविषयी मी इतका उत्साही यापूर्वी कधीच नव्हतो. या मालिकेचे कथासूत्र आणि कहाणी अत्यंत आगळीवेगळी आहे व ती प्रेक्षकांची उत्कंठा सदैव जागी ठेवणार आहे. Voot Select वर प्रेक्षकांना काही मोठ्या कमालीच्या गोष्टी पाहता येतील. असुरला प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात हे जाणून घ्यायला मी प्रचंड उत्सुक आहे.''
Voot Select शी बनलेल्या आपल्या नात्याविषयी साकिब सलीम म्हणाला, '' क्रॅकडाऊनमधली माझी भूमिका मोठी रोचक आहे, ज्यात प्रेक्षकांना माझ्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू पाहता येईल. मला गुप्तहेरांची गोष्ट सांगणारी एक तरी मालिका करायची होती आणि मी या मालिकेचे कथानक वाचले तेव्हाच ठरवले की मला हे केलेच पाहिजे. ही मालिका प्रेक्षकांना पडद्याशी खिळून रहायला भाग पाडणारी आहे आणि लोकांना ती जरूर आवडेल याची मला खात्री आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की Voot Select हा अतिशय मनोवेधक कन्टेन्ट पुरविणारा मंच आहे आणि इथे तुम्हाला नक्कीच काही महान कहाण्या अनुभवता येतील. सध्याच्या डिजिटायझेशनच्या जगामध्ये चांगला कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
या लाँचच्या वेळी दिग्दर्शक अपूर्व लाखिया म्हणाले, ''कथाकथन हे पहिले आणि सबळ वैशिष्ट्य असलेल्या Voot Select या मंचाने माझ्यासारख्या फिल्ममेकर्स आणि गोष्टी सांगणा-यांना आपली कल्पनाशक्ती मोकळी सोडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हा मंच विलक्षण आहे आणि त्यावरील कार्यक्रम अनोखे दिसत आहेत. Voot वर उपलब्ध विविध प्रकारांतील कार्यक्रम आणि ताज्या संकल्पना यांच्यामुळे प्रेक्षकांना खरोखरंच मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ''
लाँचच्या वेळी दिग्दर्शक विक्रम भट म्हणाले, ''Voot Select डिजिटल क्षेत्रात दाखल झाल्याने मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये एक सुखकारक बदल आला आहे. या मंचाकडे असलेल्या कहाण्या आणि संकल्पना अत्यंत ताज्या आणि नवीन आहेत. Voot Select आणि इल्लिगलच्या टीमबरोबर काम करणे हा अत्यंत उत्कृष्ट अनुभव होता आणि या मंचावरून भेटीला येणा-या सर्व कहाण्यांचा मी मनापासून आनंद घेणार आहे याची मला खात्री आहे.''
आपल्या मालिकेबद्दल बोलताना राजीव खंडेलवाल म्हणाला, ''एक कलाकार म्हणून नेहमीच माझ्या प्रेक्षकांसमोर माझी सर्वोत्तम कामगिरी सादर करण्याचा माझा हेतू असतो. माझी अभिनयक्षमता आणखी विस्तारण्यास मदत करतील अशाच भूमिका निवडण्याचा प्रयत्न मी करतो. 'मर्ज़ी' मधील माझी भूमिकाही मी साकारलेल्या भूमिकांच्या यादीत एक मोलाची भर ठरणार आहे. एक अभिनेता म्हणून एका संपूर्णपणे अनोळखी प्रांतात पाऊल ठेवणे काही वेळा चिंता निर्माण करते पण या मालिकेचे कथासूत्र इतके चमत्कारिक आणि विषयाशी बांधलेले होते की मला काही केल्या तिचा भाग बनायचेच होते. Voot Select हा एक अप्रतिम मंच आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खरोखरंच कमालीचा होता. अशाप्रकारच्या धाडसी कन्टेन्टची निर्मिती केल्याबद्दल आणि मला त्याचा भाग बनविल्याबद्दल मी या मंचाचा आभारी आहे. ''
Voot Select च्या लाँचप्रसंगी बोलताना आहना कुमरा म्हणाली, ''मला 'मर्ज़ी'चे स्क्रिप्ट वाचताक्षणी आवडले. याची कहाणी वेगळी आहे, ताकदीची आहे आणि असे काही मी यापूर्वी कधीच केले नव्हते. हा एक धाडसी आणि महत्त्वपूर्ण असा संवाद आहे आणि तो जाहीरपणे घडायला हवा. या डिजिटल युगाने अभिनेत्यांसाठी संधीची किती दारे खुली केली आहेत आणि किती सा-या कहाण्या आणि संकल्पनांबरोबर प्रयोग करून पाहण्याची संधी दिली आहे. या अनुभवाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. मला आपले अभिनयकौशल्य नव्याने सिद्ध करू देणारा 'मर्ज़ी' सारखा मास्टरपीस घडविल्याबद्दल आणि त्यानिमित्ताने सर्वोत्तम निर्माते आणि सह-कलाकार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी Voot Select ची आभारी आहे. ''
असुरमधल्या आपल्या भूमिकेबद्दल बोलताना बरुन सोबती म्हणाला, ''असुर म्हणजे समविचारी लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली एक अप्रतिम कलाकृती आहे. खोटे कशाला सांगू पण जेव्हा आम्ही ही मालिका शूट केली तेव्हा वाटले की, ही मालिका तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवणारी होती. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये माझ्याकडून इतके काही मागणारी दुसरी भूमिका मी साकारलेली नाही. वैयक्तिकरित्या मला नेहमीच असे वाटत आले आहे की भारतामध्ये चांगल्या लिखाणाची कमतरता नेहमीच होती आणि इथे लेखन हाच आमच्या मालिकेचा महानायक आहे. बाकी मालिकेतील प्रत्येक जण आपापले काम करत होता आणि प्रत्येकाने ते आपल्या सा-या ताकदीनिशी केले आहे. अत्‍यंत प्रतिभावान अशा कलावंतांच्या गटाबरोबर काम करण्याचा अनुभव आयुष्यभर जपून ठेवावा असा होता. मला वाटतं असूरच्या बाबतीत योग्य कामांसाठी नेमकी माणसे निवडली जाण्याचा संयोग जुळून आला होता.''
या सर्व मनोरंजनावरचा कळस म्हणजे द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट, द डेली शो विथ ट्रेव्हर नोआह, द लेट शो विथ जेम्स कॉर्डन, एंटरटेनमेन्ट टूनाइट, डॉ. फिल, डेली मेल टीव्ही, द गार्डियन नॉर्टन शो आणि असे जवळजवळ सगळेच मोठमोठे डेली टॉक शो फक्त Voot Select वर पाहता येणार आहेत.
फॅशन वन, क्लबिंग टीव्ही आणि रिअल मद्रिद टीव्हीसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय चॅनल्सशी केलेल्या भागीदारीतून या मंचावर मोठे फॅशन इव्हेन्ट्स, संगीत समारोह आणि फुटबॉलविषयक खास कन्टेन्टचे २४ तास लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. आर्सेनल आणि चेल्सीच्या कट्टर चाहत्यांसाठीही आठवडाभर काही खास कन्टेट उपलब्ध असणार आहे. LGBTQ समुदायासाठी २४/७ चालणारे जगातील सर्वात मोठे चॅनल Revry TV हेसुद्धा Voot Select च्या माध्यमातून भारतात प्रवेश करणार आहे. या मंचाच्या विविधतेमध्ये त्यामुळे अधिकच भर पडणार आहे. गेमिंगच्या चाहत्यांनासाठीही इथे वर्ल्ड पोकर टूरच्या सामन्यांसारख्या कित्येक गोष्टी या सेवेद्वारे उपलब्ध असणार आहेत. 
Voot Select चा अनुभव घेण्यासाठी Voot अॅप डाऊनलोड करा. अॅण्ड्रॉइड, iOS आणि वेब यूजर्ससाठी उपलब्ध असलेली ही नवीन प्रीमियम सेवा ९९ रुपयांच्या मासिक वर्गणीमध्ये उपलब्ध आहे तसेच ९९९ रुपयांच्या वार्षिक सदस्यत्वावर ४९९ रुपयांची विशेष स्वागतपर ऑफर लागू आहे.

No comments:

Post a Comment