Friday 17 July 2020

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात ! जणू शूटचा पहिलाच दिवस आहे असे वाटले – शशांक केतकर

सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात !
जणू शूटचा पहिलाच दिवस आहे असे वाटले – शशांक केतकर

मुंबई १७ जुलै, २०२० : रणजीत – संजीवनी, शिवा – सिध्दी आणि आता अनु - सिध्दार्थ सज्ज झाले आहेत पुन्हा केदा आपल्या भेटीस येण्यासाठी ... कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे... मालिकेमधील अनु - सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हाएकदा नव्याने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यांच्या नात्यातील वैशिष्ट्य म्हणजे त्यांच निस्वार्थी नात, एकमेकांनमधील विश्वास आणि प्रेम, तसेच एकमेकांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे संकटावर त्यांनी केलेली मात... हे सगळ एकदा पुन्हा अनुभवता येणार आहे नव्या घटनासोबत... नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रोमोमध्ये अनु सिद्धार्थला सांगते आहे गोडधोड बरोबर काही चमचमीत, आंबट  करायला शिक... म्हणजे येत्या भागांमध्ये अनु गोड बातमी देणार हे नक्की !
              सिध्दार्थची भूमिका साकारणारा शशांक केतकर म्हणाला मी जवळपास चार महिन्याने सेटवर गेलो आणि समोर आमची टिम उभी होती तेंव्हा असे वाटलं की, खूप दिवसांनी काही भेटत नाहीये आपण या सगळ्यांना आताच सुट्टी संपली आणि मी सेटवर आलो आहे... पण जेंव्हा मंदार देवस्थळी यांचे लाईटस, कॅमेरा अॅक्शन हे शब्द कानावर पडले तेंव्हा अचानक पोटात गोळा आला आणि मालिकेचा पहिलं दिवस आठवला ... एखादी मालिका सुरू असताना सगळ नवीन वाटण ही मला खूप सकारात्म्क गोष्ट वाटली... सगळे मिळून काम करत आहोत एकानव्या जोमाने, उत्साहाने शूट सुरू झाले आहे... एकमेकांचा हातभार मिळतो आहे...पुन्हाएकदा उभ रहाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत आम्ही सगळेच... खूप आनंद वाटतो आहे”.
           मालिकेतील लाडके कलाकार सज्ज झाले आहेत तुमचे मन जिंकायला... सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले. मालिका आता रंजक वळणावर पोहचली असून, मालिकांचे नवे भाग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेतेंव्हा आपण सज्ज होऊया पुन्हा एकदा अनु - सिध्दार्थ नात्याच्या नव्या रंगात रंगून जाण्यासाठी २१ जुलैपासून रात्री ९.०० वा नक्की बघा आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment