Friday, 3 July 2020

अभिनेता अमेय हुनसवाडकर च्या नवीन शॉर्ट फिल्म चा धुमाकूळ

प्राणाहा लघुपट मी नुकताच बनवला आणि तो खुप लोकानां आवडला.बऱ्याच फेसबुकपेज वर तो विडिओ वायरल सुद्धा होतोय.प्रशंसा करणारे खुप सारे मेसेज , कॉल्स , व्हॉइस मेसेज आले अगदी इंडस्ट्री मधल्या सिनियर मंडीळीचेही त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासुन धन्यवादपण तरी मला इथे थोडा व्यक्त व्हावंसं वाटतयही फिल्म बघताना काही लोकानां कदाचित प्रश्न पडला असावा कि डिप्रेशन मध्ये असणारा आणि आत्महत्या करण्यासाठी तयार होणार हा नायक इतका शांत का ? इतका रिलॅक्स का ? खरं तर ह्या नायकाचं डिप्रेशन , त्याच्या मनात होत असलेली घालमेल , त्याच जीवनात आलेलं नैराश्य इतकं सरळ का दाखवलं गेलं आहे ? प्रेझेन्टेशन चे वेगळे प्रकार तर असतातच  पण मित्रानो त्याच दुसरं कारण म्हणजे सुशांत सिंग राजपूत......हो . . . ही फिल्म बघताना लोकांसमोर सुशांत येणार , लोकानां त्याची आठवण होणार , त्याच्या मनाची घालमेल अशीच झाली असणार असं लोकांच्या मनात येणार हे मला माहित होत.आणि तसंच झालं.फिल्म पाहिल्यावर जे रिस्पॉन्स आले त्यातले ९०लोकं हेच म्हणाले कि त्यानां सुशांत दिसलाह्या फिल्म मधला नायक मी कसाही प्रेझेन्ट करू शकलो असतो जसे कि , डिप्रेशन मुळे दारू , ड्रग्स ची नशा केलेला , आरडाओरडा आणि आदळआपट करणारा , खूपच हतबल झालेला पण तसे मी नाही दाखवले कारण मला सुशांत च्या इमेज ला कुठल्याही प्रकारचं गालबोट लावायचं नव्हतं.माझ्या फिल्मच्या नायकाला बघुन सुशांतची शांत प्रतिमाच लोकानां दिसावी हेच मी ठरवलं होत.आणि तेच झालं.लोकांना या फिल्म मधला सायलेन्स , साधेपणा आवडला आणि इथे आम्ही थोडं का होईना पण जिंकलोआजकाल आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत त्यामुळे नैराश्य येणे स्वाभाविक आहे.ही 3:30 मिनिटांची शॉर्टफिल्म एकदा बघा आणि दुसऱ्यांना सुद्धा दाखवा .... कदाचित तुम्ही ही फिल्म तुमच्या ओळखीच्या व्यक्तीपर्यंत पोहचली तर नकळत तुम्ही एखाद्याला आत्महत्ये पासुन वाचवु शकता कारण हीच वेळ आहे एकमेकांना सावरण्याची.
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.🙏💐

No comments:

Post a Comment