Monday, 13 July 2020

कलर्स मराठीसोबत करूया पुन्हाएकदा नवी सुरुवात २१ जुलैपासून !

मुंबई १३ जुलै, २०२० : काही महिन्यापासून आपल्यावर ओढावलेल्या संकटामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्र जणू ठप्प झालं होतं... पण, आता मात्र सगळे सुरळीत होऊ लागले आहे असे म्हणायला हरकत नाही... हळूहळू सगळकाही पूर्ववत होताना दिसू लागले आहे... आपल्या आवडत्या मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे... महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी ज्याने हा संकंटावर मात केली त्या रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन नव्या उमेदीसोबत कलर्स मराठी वाहिनी पुन्हा सज्ज झाली आहे. तेंव्हा आपल्या लाडक्या कलाकार आणि मालिकांसोबत पुन्हाएकदा करुया मनोरंजनाची नवी सुरुवात २१ जुलै संध्या ७.०० वाजल्यापासून महाराष्ट्राच्या आवडत्या वाहिनीसोबत म्हणजेच कलर्स मराठीसोबत... आपल्या नात्यातील गोडवा अजूनच बहरणार,जेंव्हा नव्या उत्साहात, नव्या ढंगात आपली भेट पुन्हा होणार...श्रावणाच्या नव्या रंगात रंगून जाऊया, नव्या विश्वासाने पुन्हा सुरुवात करूया... बाळूमामाच्या नावानं चांगभलं, जीव झाला येडापिसा, राजा रानीची गं जोडी, स्वामिनी आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांचे नवे भाग २१ जुलैपासून येत आहेत आपल्या भेटीला संध्या ७.०० वा.पासून...
आपल्यातील दुरावा मिटवून मैत्री, प्रेम, विश्वास, भक्ति यां रंगाची पुन्हाएकदा नव्याने उधळण होणार आहे... अवघा महाराष्ट्र ज्यांच्या जयघोषाने दुमदुमला असे संत बाळूमामा’, स्वामिनी मालिकेमधील पेशवाईचा काळ आणि त्याचं देखणं रूप… रमाचा निरागस स्वभाव तर दुसरीकडे अत्यंत कठोर, धोरणी गोपिकाबाई, सिध्दी – शिवाच्या नात्यातील गोडवा, संजु – रणजीतमध्ये फुलणारे प्रेम, अनु – सिध्दार्थचं निस्वार्थी नात... हे सगळ पुन्हा एकदा नव्या रंगात आपल्या भेटीला येत आहे एक रंजक वळण घेऊन खास तुमच्यासाठी... महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार...  मालिकांचे शूट सुरू झाले असून सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसरमेकअप रूम्ससेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे.
तीन महिन्याच्या या दुराव्यानंतर आपलं नात पुन्हा एकदा नव्याने बहरणारतेंव्हा सज्ज होऊया नात्याच्या नव्या रंगात रंगून जाण्यासाठी नवी उमेद नवी भरारी नव्या रंगात कलर्स मराठी ! आपल्यातील नात्याची वीण घट्ट करण्यासाठी नवा निर्धार घेऊन आम्ही येत आहोत तुमच्या दारी २१ जुलै संध्या ७.०० वाजल्यापासून...

No comments:

Post a Comment