मदरपॉडतर्फे ‘सैनिक फॉर डॉक्टर्स’ ची सुरुवात
मुंबई, १८ जुलै २०२०: मदरपॉड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड हा पहिला-वहिला शेअर्ड मोबिलिटी सोल्युशन्स प्रोव्हायडर असून माजी सैनिकांकडून चालविण्यात येतो आहे. मदरपॉड’चा कॉर्पोरेट वाहतूक पर्याय प्रामुख्याने रुग्णालये, सरकारी एजन्सी, कॉर्पोरेटस (खासगी आणि सार्वजनिक संघटना) तसेच हॉस्पिटलीटी उद्योगक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध करून दिला आहे. कोविड-१९ लढ्यात सक्रीय आरोग्य कर्मचारी वर्गासाठी ‘सैनिक फॉर डॉक्टर्स’ हा उपक्रम समर्पित असून त्याचा शुभारंभ ‘बेंगळूरू मेडीकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टीट्युट’ मध्ये करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात मुंबई, बेंगळूरू, दिल्ली आणि हैदराबाद येथील हेल्थकेअर इन्स्टीट्युशन’ ना त्यांच्या आरोग्य कर्मचारी वर्गाला वाहतूक सेवेचा लाभ मिळावा म्हणून मदरपॉड समवेत भागीदारी करता येणार आहे. या माध्यमातून डॉक्टर तसेच अन्य आरोग्य कर्मचारी वर्गाला घरी परतण्यासाठी आणि पुन्हा रुग्णालयात पोहोचण्याकरिता सुरक्षित वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी संरक्षण दलातील माजी सैनिक सज्ज झाले आहेत.
या उपक्रमाद्वारे मदरपॉड सुरक्षित, संरक्षित आणि निर्जंतूक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. राष्ट्राला आजीवन सेवा देण्याची शपथ सैनिकांनी घेतलेली असते. देशाप्रती आपल्या निष्ठेचे स्मरण ठेवत हा सैनिक वर्ग देशाचे आरोग्य कर्मचारी कोणत्याही भीतीशिवाय तसेच स्वत:च्या आरोग्याविषयी शंका न बाळगता नियमित सेवेवर रुजू होईल याची खातरजमा ठेवतील. सध्याची परिस्थिती आणि आघाडी सांभाळणाऱ्या आरोग्य दूतांसमोर असलेली आव्हाने लक्षात ठेवत मदरपॉड काटेकोर सामाजिक अंतर आणि सुरक्षेचे प्रोटोकॉल राखले जात आहेत, यावर देखरेख ठेवेल. उदाहरणार्थ, प्रत्येक फेरीत कमाल दोन प्रवासी असतील हे निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक वाहनात गुणवत्तापूर्ण सुरक्षित अॅक्रलिक पार्टीशन बसविलेले असेल. त्याशिवाय एकदा वापरला जाईल असा पीपीई सूट, सोबत ग्लोव्हज, सॅनिटायजर आणि मास्क प्रत्येक प्रवाशाला प्रवास सुरू करताना देण्यात येईल. प्रत्येक प्रवासी फेरी पूर्ण झाल्यावर वाहनाचा आतील भाग निर्जंतूक केला जाणार आहे.
मदरपॉडचे हेड ऑफ पार्टनरशीप कॅप्टन संजय कुमार सिंग म्हणाले की, “मदरपॉड’ चे उद्दिष्ट तंत्रज्ञान-युक्त वाहतूक पर्याय श्रेणी उपलब्ध करून देण्याचे आहे. आमचा पहिला उपक्रम ‘सैनिक फॉर डॉक्टर्स’ची सुरुवात करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो. कोविड-पश्चात परिस्थितीत सुरक्षित प्रवासासाठी सुरक्षित उपाययोजना आणि मानके अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहेत. मग ती वाहतूक आरोग्य दूतांची असो किंवा प्रवास करणाऱ्या लोकांची! माजी सैनिक हे आव्हान पेलण्याच्या दृष्टीने आदर्श आहेत. ते शिस्तबद्ध असतात व सर्वोच्च सुरक्षाविषयक प्रोटोकॉल पाळण्याचे त्यांना प्रशिक्षण असते. मदरपॉड माजी सैनिकांना त्यांच्या करीयरमध्ये आगेकूच करण्यासाठी सहयोगी सुविधा पुरवणार आहे.”
मदरपॉड’ने विविध संरक्षण संघटनांसमवेत भागीदारी केली आहे. आगामी ३ वर्षांत लष्करात सेवा दिलेल्या सुमारे १००,००० व्यक्तींना मदरपॉड कंपनी नव्याने कौशल्य शिकवून त्यांचे पुनर्वसन करणार आहे. मदरपॉडकडे अत्याधुनिक स्वरुपाची सैनिक कंट्रोल रूम असून सैनिकांद्वारे हेल्पलाईन चालविण्यात येते. भारतभर असणाऱ्या धोरणात्मकरित्या स्थापन करण्यात आलेल्या कमांड सेंटरमधून सर्व वाहन ताफ्यावर देखरेख ठेवण्यात येते.
No comments:
Post a Comment