प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद बघण्यात वेगळाच आनंद असतो - रितिका श्रोत्री
आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याने अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने प्रेक्षकांना क्लीन बोल्ड केलं आहे. कमी वयातच तिने तिच्या प्रतिभेने एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. २०१९ मधील तिच्या टकाटक या चित्रपटाने बॉक्स-ऑफिस गाजवलं. तिच्या चित्रपटातील भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं. हा चित्रपट लवकरच झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्या निमित्ताने रितिका सोबत साधलेला हा खास संवाद
- या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आणि अनेक पुरस्कारही मिळवले, हे आनंदी क्षण तुम्ही कसे सेलीब्रेट केले?
- सिनेमा प्रदर्शित झाल्यावर आम्ही भरपूर थिएटर्सना भेट दिली. प्रेक्षकांनी भरलेलं थिएटर आणि त्यांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद बघण्यात वेगळाच आनंद होता. प्रेक्षकांसोबतच आम्ही हे क्षण सेलीब्रेट केले.
- तुझ्या सिनेमातील भूमिकेसारखीच तु वैयक्तिक आयुष्यात आहेस का?
- मी मीनाक्षी या कॉलेज तरुणीची भूमिका साकारलेली आहे. या मीनाक्षीपेक्षा माझा स्वभाव,भाषा थोडी वेगळी आहे. पण या कारणामुळेच मला हि भूमिका साकारायची होती. आणि ती मी खूप एन्जॉय सुद्धा केली.
- या कठीण काळात मीनाक्षी प्रेक्षकांना कोणता सल्ला देऊ इच्छिते?
- मी सगळ्या पोरांना एकच सांगीन... "पोराहो !! काय पण झाला तरी घरातच बसा अन आमचा पिच्चर पाहायला इसरू नका."
- झी टॉकीज २६ जुलै रोजी टकाटक सिनेमाचा "वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर" करणार आहे, या बद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि तु तुझा दिवस कसा घालवणार आहेस?
- मला खूपच आनंद होत आहे, झी टॉकीज पहिल्यांदाच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आहे. ज्यांनी टकाटक सिनेमा बघितला नाहीये, त्यांच्यासाठी टकाटकचा झी टॉकीजवरील वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर हि एक सुवर्ण संधी आहे.
- सगळं जग थांबलेलं आहे. या लॉकडाउन मधील तुझी एखादी टकाटक आठवण आहे का?
- पुणे पोलिसांनी राबवलेल्या एका मोहिमेत मला सहभाग घेण्याची संधी मिळाली. पुणे पोलिसांनी एका गाण्याद्वारे कोरोनाच्या काळात कोणती काळजी घेतली पाहिजे, याचे प्रबोधन केले. हीच माझ्यासाठी टकाटक मोमेन्ट होती.
No comments:
Post a Comment